Awaj India
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेला भरघोस निधी उपलब्ध होईल-गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीने समावेश करा*गोकुळच्या अध्यक्ष निवडीत लोकशाहीचा गळा घोटू नका; आमदार सतेज पाटील यांचे आवाहनगोकुळमध्ये प्रशासक नियुक्तीच्या हालचालींना विरोधजय हनुमान हायस्कूल व बाळकृष्ण विष्णू वडेर ज्युनिअर कॉलेज, इस्पुर्लीचा स्तुत्य उपक्रमसायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी* *‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेलऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदारांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा!आबाजी होणं सोपं नाही!अबब!!!! अंबाबाईच्या भक्तांकडून तब्बल चारशे किलो खिचडी, वाटपसाताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!*

जाहिरात

 

‘गोकुळ’ सहकारातील आश्वासक ब्रँड : श्री. संतोष पाटील

schedule05 Jan 24 person by visibility 1092 categoryआरोग्य



कोल्हापूर: ता: कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संतोष पाटील यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे बुधवार दि.०३/०१/२०२४ इ.रोजी सदिच्‍छा भेट दिली. त्यावेळी गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे संचालक अभिजीत तायशेटे यांच्या हस्ते गोकुळ प्रधान कार्यालय येथे सत्कार करण्‍यात आला.

          यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील म्हणाले कि, महाराष्ट्र व संपूर्ण देशामधील एक अग्रगण्य सहकारी दूध संघ म्हणून गोकुळचा नावलौकिक आहे. दूध संकलन, दूध प्रक्रिया व विक्री या संपूर्ण साखळीमध्ये गोकुळच्यावतीने शास्त्रीय दृष्टीकोन व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाखाण्याजोगा आहे. त्यामुळेच बाजारापेठेमधील गोकुळ हा एक सहकारातील आश्वासक ब्रँड आहे असे गौरवोद्गार काढले.

          यावेळी शासनामार्फत लाळ खुरकत, लम्पी, थायलेरिया या लसी वेळेवरती उपलब्ध करून देणे संबंधी व जनावरांच्या लसीकरणासाठी वंध्यत्व निवारण शिबिरासाठी गावोगावी खोडी उभी करण्यात यावी या विषयावरती चर्चा करण्यात आली. या चर्चेवेळी श्री.संतोष पाटील म्हणाले कि, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व गोकुळचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांची संयुक्तपणे तिमाही आढावा मिटिंग व्हावी जेणे करून शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनाची माहिती दूध उत्पादकांना समजेल व यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होईल.

          गोकुळच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या बायोगॅस प्रकल्प, स्लरी प्रकल्प तसेच जनावरांच्यासाठी आयुर्वेद्क उपचार पद्धती, वासरू संगोपन योजना, भविष्य कल्याण निधी या विविध उपक्रमांची माहिती कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी दिली.

          यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद बाबर, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, सहा.महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, व्यवस्थापक (प्रशासन) रामकृष्ण पाटील, व्यवस्थापक (पशुसंवर्धन) डॉ.उदय मोगले, व्यवस्थापक (संकलन) शरद तुरंबेकर, सुधाकर पाटील, उदय पाटील, आर.बी.पाटील व संघाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes