Awaj India
Register
Breaking : bolt
मानवांच्या दूरदृष्टीतून संविधानाने सर्व जीवांना अस्तित्वाचा अधिकार दिला – बबनराव शिंदेविद्या मंदिर पणोरे येथे संविधान दिन उत्साहात साजराजिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यपदी नियुक्तीची वसंत चांदुरकर यांची मागणीकास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत एकदिवसीय धरणे आंदोलनम्हैसूरच्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत कोल्हापूरचा डंका!*चांगल्या जीवनशैलीतून सामाजिक शांतता, राष्ट्रउभारणी शक्य – डॉ. बी. आर. कोरेभारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमानी संघाचे दुसरे महाराष्ट्र राज्य संमेलन २१ नोव्हेंबरलाडी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटीलमुलगा किंवा राजकीय व्यक्तींची स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती होणार नाही _ मुश्रीफ यांची स्पष्टोक्तीगोकुळ’ मध्‍ये वसुबारस निमित्‍त म्हैस व गाय-वासराचे पूजन

जाहिरात

 

दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 24000 लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड

schedule04 Dec 23 person by visibility 487 category

*कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 24000 लाभार्थ्यांना स्वखर्चातून आयुष्मान भारत कार्ड देणार- माजी आमदार अमल महाडिक

कोल्हापूर : आवाज इंडिया

सर्वसामान्य गोरगरिबांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना आणली आहे. या अंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान भारत कार्ड असणे आवश्यक आहे. 

सर्वसामान्य लोकांना घरबसल्या आयुष्मान भारत कार्ड मिळावे या हेतूने माजी आमदार अमल महाडिक यांनी स्वखर्चातून हे कार्ड्स वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 24 हजार पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी येणारा सर्व खर्च माजी आमदार अमल महाडिक यांनी उचलला असून लवकरच घरोघरी ही कार्ड वितरित केली जाणार आहेत.

दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बूथ रचनेच्या माध्यमातून घरोघरी हे कार्ड्स वितरित केले जातील. केंद्र शासनाची ही अभिनव योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा अमल महाडिक यांचा प्रयत्न आहे. 

आयुष्मान भारत कार्ड घरबसल्या मिळाल्यामुळे लाभार्थ्यांची धावपळ वाचणार असून भविष्यात चांगल्या आरोग्यविषयक सेवेचा लाभ त्यांना घेता येणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes