भाजपाच्यावतीने ८ मार्च रोजी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
schedule06 Mar 24 person by visibility 107 categoryराजकीय
कोल्हापूर दि.०४ ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रक्त तपासणीच्या HB, CBC, RFT, LFT, कॅल्शीयम, थायरॉईड इत्यादी विविध तपासण्यांचा समावेश आहे. तसेच तज्ञ डॉक्टरांकडून स्त्रीरोग, अस्थिरोग, मेंदू व मणक्याचे आजार, मधुमेह, हृदयरोग, पोटाचे आजार, त्वचा विकार, कान-नाक-घसा, केसांचे विकार, दातांचे विकार अशा सर्व आजारांची तपासणी अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, डेंटल, फ़िजिओथेरपींचे डॉक्टरांकडून करण्यात येणार आहे. याप्रसंगी ज्या महिला डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये योगदान दिलेले आहे, त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
हे शिबिर नागाळा पार्क येथील भाजपा जिल्हा कार्यालयात संपन्न होईल. यात तपासणी करणाऱ्या रुग्णांना महात्मा फुले / आयुष्यमान, मुख्यमंत्री सहाय्त्ता निधीतून पुढील उपचार केले जाणार आहेत. शुक्रवार दिनांक ०८ मार्च रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहील आहे.
एकाच छताखाली महिलांसाठी अनेक महत्वपूर्ण तपासण्या होणार असल्याने जास्ती-जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे.