Awaj India
Register
Breaking : bolt
डॉ. हरीश भालेराव यांची ‘नॅशनल आयडियल टीचर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड-२०२६’साठी निवडडी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा* *देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकार*नवीन शैक्षणिक धोरणातील कार्यभार व CHB प्राध्यापकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्याबालकांसाठीचा पोक्सो कायदा कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यतेतील अन्यायकारक निकष बदलण्याची मागणीसामाजिक क्षेत्राला नियमनाची दिशा; ‘महा सीएसआर प्राधिकरणा’कडे महाराष्ट्राची वाटचाल**डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या* *विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स*बागल चौक दफनभूमीसाठी जेसीबी मशीनचे लोकार्पणबँकांनी पतपुरवठा आराखड्याचे अर्ध वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करावे*जिल्हा परिषदेत गणेशोत्सव रद्द करू नका; सदस्यांची अध्यक्षांकडे मागणी

जाहिरात

 

निगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद

schedule05 Apr 24 person by visibility 680 categoryराजकीय


कोल्हापूर ; आवाज इंडिया

 कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी बुधवारी करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथे संवाद साधला. दिलीपसिंह चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट दिली. 

दिलीपसिंह चव्हाण, रणजीतसिंह चव्हाण, संग्रामसिंह चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी लोकसभा निवडणूक संदर्भात चर्चा झाली. "महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जिल्ह्यात सर्वत्र भरभरून प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी आपली उमेदवारी आहे" असे शाहू छत्रपतींनी सांगितले.


 याप्रसंगी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी एच पाटील, बाजीराव पाटील, राजाराम कासार, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले आंबेवाडीचे सिकंदर मुजावर, शिये ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रभाकर काशीद, पंचायत समितीचे चंद्रकांत पाटील, निगवे दुमाला सरपंच रूपाली पाटील, उपसरपंच संकेत बामकर, जयहिंद सोसायटीचे चेअरमन बाळासो शिरोळकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बत्तास एकशिंगे, देवस्थानचे सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील, हंबीरराव वळके, पाणीपुरवठाचे चेअरमन सर्जेराव पाटील, डॉ. किडगावकर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes