Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पी. साळोखेनगर मध्ये रविवारी "सतेज मॅथ्स स्कॉलर" परीक्षेचे आयोजन*डी.वाय. पाटील च्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट चुये येथे आज पासून श्री दत्त जयंती सोहळा महापुरुषांचे विचार शालेय अभ्यासक्रमात असावेत : कौस्तुभ गावडे कर्तृत्ववान मुख्याध्यापिका सौ. सुहासिनी उदय कदम यांचा प्रेरणादायी प्रवासआदर्श व्यक्तिमत्व मुख्याध्यापक आत्माराम विश्वनाथ सोनोने धनश्री मोहिते विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाची उज्ज्वल परंपरा आदर्श शिक्षक जनार्दन मधुकर कांबळे सर : विद्यार्थ्यांच्या घडवणुकीसाठी समर्पित कार्यशैलजा पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी सुनंदा प्रकाश मुसळे : सेवेतून आदर्श घडवणाऱ्या शिक्षिका

जाहिरात

 

द न्यू एज्युकेशन सोसायटी संस्थेची चूकच

schedule10 Feb 25 person by visibility 651 categoryशैक्षणिक

कोल्हापूर;
 
द न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित विमला गोयंका हायस्कूल जुनियर कॉलेजच्या बाबतीत घडलेल्या प्रकार म्हणजे संस्थेची चूक असल्याचं निदर्शनात येत आहे. 25 ते 30 लाखापर्यंतच्या फी विद्यार्थ्यांच्या कडून घेऊन त्यांचा परीक्षा फॉर्म पेन्सिलने भरणे या मागचं गोड बंगाल काय आहे याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
 
बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा फॉर्म पेन्सिलने भरणे याबद्दल पदाधिकारी यांना विचारले असता आपल्याला त्याची माहितीच नाही असे बोलले जाते. एखाद्या प्राध्यापकाच्यावर ढकलून देणारा हा प्रकार मूर्खपणाचा आहे. अकॅडमीच्या झालेल्या आर्थिक व्यवहारात विद्यार्थ्यांसह पालकांना मात्र मनस्ताप झाल्याचा प्रकार समोर येत आहे. आर्थिक व्यवहारामुळे संस्थेसाठी मोठा खड्डा खणून पदाधिकारी काय साधणार आहे हे समजायला मार्ग नाही.
 
विद्यार्थी बारावीची परीक्षा देत असताना त्याच्या अकरावीचे फॉर्म आज रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 ला भरून घेतले जात होते. हा शिक्षण व्यवस्थेला लागलेला काळीमा आहे. द न्यू एज्युकेशन सोसायटी ही एकटीच संस्था जबाबदार नसून आर्थिक व्यवहारात सापडलेली शिक्षण व्यवस्था सुद्धा तितकीच जबाबदारी आहे. जे विषय शिकवले जात नाही त्या विषयाची फी कशी घेतली जाते याबाबत पालकांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं आहे.
या संस्थेच्या परवानगी पासून ते बेकायदेशीर रित्या भाड्याने दिलेली संस्थेतील जागा असो सर्वच संशयाच्या भोवऱ्यात आहे. विद्यार्थ्यांना फी भरलेली पावती सुद्धा मिळत नसल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत. संस्थेमध्ये  शिक्षक शिकवायला आहे त्यांची पात्रता काय आहे याबाबत सुद्धा संस्थाचालकांना कसलीही भान नसल्याचे दिसत आहे. 
 
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes