Awaj India
Register
Breaking : bolt
जिल्ह्यातील ३१ आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ९० सराईत गुन्हेगारांना कडक सूचनासंविधान साक्षर शाळेच्या उपक्रमातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यासआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रा. तुळशीदास हरी कांबळे यांची निवडडॉ. दत्तात्रय केरबा कांबळे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीरअंगणवाडी सेविकेच्या कार्याची उल्लेखनीय कामगिरी; ज्योती कांबळे यांचा गौरवपल्लवी गोसावी यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवडतंत्रस्नेही शिक्षक म्हणून शहाजी गायकवाड यांची उल्लेखनीय कामगिरीडॉ. हरीश भालेराव यांची ‘नॅशनल आयडियल टीचर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड-२०२६’साठी निवडडी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा* *देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकार*

जाहिरात

 

एक कोटीच्या जामीनावर सुटलेल्यांनी अमल महाडिक यांच्यावर बोलू नये

schedule10 Feb 24 person by visibility 1658 categoryगुन्हे

*एक कोटीच्या जामीनावर सुटलेल्यांनी अमल महाडिक यांच्यावर बोलू नये - माजी नगरसेवक आशिष ढवळे यांची खरमरीत टीका*
कोल्हापूर ;
          ज्यांचे नेतेच दुसऱ्याचे श्रेय लाटतात त्यांनी टीका करणे म्हणजेच चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका भाजपचे माजी नगरसेवक आशिष ढवळे यांनी शारंगधर देशमुख यांच्यावर केली. माजी आमदार अमल महाडिक यांनी पद नसतानाही कोट्यवधींचा निधी मतदारसंघासाठी खेचून आणला याचा पोटशूळ विरोधकांना उठल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

         केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन आणि अमृत योजनेतील विकास कामांची उद्घाटने सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील हे काका पुतणे करत सुटले आहेत, त्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी असेही ढवळे यांनी सुनावले. महादेव जानकर हे महायुतीतील नेते आहेत आणि त्यांच्या शिफारसीनुसार मिळालेला हा निधी आहे. उद्घाटने घेऊन या विकासकामांचे श्रेय घेण्याचे काम सतेज पाटलांच्या बगलबच्चांनी करू नये असा इशाराही ढवळे यांनी दिला. 

         सतेज पाटील यांच्या मर्जीतील काही ठेकेदारांनी बेकायदेशीरपणे काही विकास कामे केली आहेत आणि नंतर त्याची निविदा प्रक्रिया राबवली आहे हे उघड झाल्यामुळेच देशमुख यांचा तोल ढासळला आहे. लवकरच यावरही कारवाई होईल आणि सत्य उजेडात येईल असेही ढवळे म्हणाले. केंद्रात आणि राज्यात सत्ता आमची असताना तुम्ही निधी परदेशातून आणता की काय? असा उपरोधिक सवालही ढवळे यांनी केला. 

       आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात एक कोटी रुपयांच्या जामिनावर सुटलेल्या शारंगधर देशमुख यांनी आपली पातळी ओळखावी असा इशाराही आशिष ढवळे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes