Awaj India
Register
Breaking : bolt
शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार!*सोलापुरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात; शिक्षक संघटना आणि शिक्षक नेत्यांचा भक्कम पाठिंबा!*शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन विजयी करा!स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीची ताकद*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनकुर्डूवाडी-माढा परिसरात शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!*सीएचबी प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे*मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मुश्रीफ यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?आम्ही शपथ घेणारच नाही”*पहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार; शिक्षक नेते दादासो लाड यांची स्पष्टोक्ती*

जाहिरात

 

चंदगड तालुक्यात विहिरीचे पैसे पाण्यात

schedule10 Jan 25 person by visibility 1076 categoryगुन्हे

कोल्हापूर
सुळये (ता. चंदगड) येथे जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेतील विहिरीचे  पैसे पाण्यात गेले असल्याचा प्रकार ग्रामस्थांना अनुभवायला मिळाला. ठेकेदार यांनी विहिरीचे पैसे दिले नसल्याचा आरोप केला आहे.
याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी एस कार्तिकेयन अधिकारी यांना निवेदन दिले.ठेकेदार बसवंत अडकुरकर यांच्या सहमतीने वीहीर खूदायचे काम करण्यात आले. या खुदाईसाठी ग्रामस्थांनी ग्रामदेवतेच्या निधीतून खर्च करून लोकसहभागाने विहीर खोदली. जिल्हा परिषदेचे बिल मिळाले तरी ठेकेदार यांनी बिल दिले नाही. त्यांनी फसवणूक केलेले आहे. वेळेत काम पूर्ण केलेले नाही. त्यांनी विहीर खोदायचे पैसे द्यावे उर्वरित काम पूर्ण करावे, अन्यथा 26 जानेवारी आत्मदहन करणार असल्याचा इशारा सुद्धा ग्रामस्थांनी दिला यावेळी ब्लॅक पॅंथर चे अध्यक्ष सुभाष देसाई, रमेश गावडे, सुधारक कांबळे, गोपाळ गावडे, चन्नाप्पा गावडे, महादेव हजारे, शामराव कांबळे, बाळू कांबळे, मनोहर धुरी मान्यवर उपस्थित होते.
याबाबत याबाबत ठेकेदार बसवंत अडकुरकर म्हणाले जितकं काम झालेले आहे तितकाच निधी घेतलेला आहे ग्रामस्थांचं मत खरे असले तरी लोकसहभागातून उल्लेख केल्यामुळे निधी काढण्यास अडचणी निर्माण होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes