सर्वसामान्य, व्यावसायिकांना लुटणे हाच लाटकर यांचा उद्योग - सुजित चव्हाण
schedule16 Nov 24 person by visibility 61 categoryराजकीय
सर्वसामान्य, व्यावसायिकांना लुटणे हाच लाटकर यांचा उद्योग - सुजित चव्हाण
क्षीरसागरांच्या प्रचारफेरीने शिवाजी पेठेत भगवे वादळ; तालीम संस्था मंडळाकडून फुलांचा वर्षाव करीत स्वागत
कोल्हापूर, ; कोल्हापूर उत्तरचे कॉँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांचे बंधू शैलेश लाटकर यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे येथील संगणक क्षेत्रातील अनेक व्यावसायिकांची फसवणूक केली आहे. सर्वसामान्य व्यावसायिक, व्यापाऱ्यांना लुटणे हा लाटकर यांचा गृहउद्योग आहे. त्यातूनच त्यांनी मोठी मोहमाया गोळा केली आहे. उच्चभ्रू वस्तीत राहून सर्वसामान्यांचे कैवारी ठरू पाहणाऱ्या कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवाराचे पितळ जनतेसमोर उघडे पडले असल्याने लाटकर यांचा पराभव जतनाच करेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी केला.
महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठ परिसरात आयोजित प्रचारफेरीत ते बोलत होते ते पुढे म्हणाले, अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राजेश लाटकर यांनी कॉंग्रेसने घोडेबाजार केल्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर लाटकरांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या नगरसेवकांना टोळक म्हंटल. खासदार शाहू महाराजांची ज्याच्यामुळे नाचक्की झाली त्याच अपक्ष उमेदवाराला समर्थन देण्यासाठी महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्यावर कॉंग्रेसचे नेते नाहक आरोप करत आहेत.
राजेश लाटकर यांचे बंधू शैलेश यांची मायक्रोमेक कॉम्प्युटर नावाची फर्म आहे. या माध्यमातून त्यांनी कोल्हापुरातील एका व्यावसायिकाची १ कोटी ५७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे त्या व्यावसायिकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. लाटकर यांनी अनेकांना फसवले असल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा येथील संगणक व्यावसायिक अडचणीत आले आहेत. अनेक कंपन्यानी उधारी देणे बंद केले आहे. बाहेरील कंपन्या शासकीय निविदा भरण्यासही धजावत नसल्याचे त्या व्यावसायिकाने सांगितले आहे. स्वत:चे चारित्र्य स्वच्छ ठरवून महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न धनदांडगे उमेदवार राजेश लाटकर करत आहेत. वाघाचे कातडे पांघरून कोणी वाघ होत नाही. त्याचपद्धतीने सर्वसामान्य कार्यकर्त्याचे ठोंग करून लाटकर सर्वामान्य कार्यकर्ते होवू शकत नाहीत, असा टोला लगावला.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक महेश सावंत म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत असताना महापौर पदासह इतर महत्त्वाच्या निवडणुकीत फोडाफोडीच्या राजकारणात आणि घोडेबाजारात राजेश लाटकर यांचा नेहमीच हात राहिला आहे. लाटकर महापालिके अंतर्गत होणाऱ्या विविध प्रकल्पांमध्ये कमिशन आणि टक्केवारी मागत असल्यामुळे सर्व नगरसेवक हैराण झाले होते. ज्यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कार्यकिर्दीत केवळ कमिशन खाण्याचे काम केले आणि मिळेल तिथे ढपला पाडण्याचे काम केले त्यांना क्षीरसागर यांनी केलेल्या कामात हेच दिसणार. चोराला समोरचे सगळे चोरच वाटतात. अशी अवस्था त्यांची झाली आहे. यामुळे लाटकर यांनी क्षीरसागर यांच्यावर आरोप करणे म्हणजे मोठा विनोदच म्हणावा लागेल. राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या कामाच्या पाठबळावर क्षीरसागर यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांनी, राजेश क्षीरसागर यांच्या कामाची पोहच पावती मतदानाच्या रूपाने जनता देणार आहे. राजेश क्षीरसागर यांचा विजय निश्चित असल्याने त्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. येणाऱ्या चार - पाच दिवसात जुने व्हिडीओ काढून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण जनतेने वेळीच सावध व्हावे. राजेश क्षीरसागर यांचे काम जनतेने पाहिले असून जनतेने मतांच्या रूपाने आशीर्वाद राजेश क्षीरसागर यांना द्यावेत, असे आवाहन केले.
यावेळी भाजपचे महेश जाधव, माजी महापौर बाजीराव चव्हाण, शिवसेनेचे शिवाजी जाधव, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, प्रताप देसाई, सुदर्शन सावंत, सरिता हारुगले, पापा पाटील, युवराज बचाटे, गणेश पाटील, कुलदीप गायकवाड, सचिन राऊत, योगेश इंगवले, रुपेश इंगवले, शैलेश साळोखे, पियुष चव्हाण,कपिल सरनाईक, योगेश चौगले, युवराज साळोखे, शुभम शिंदे, सचिन पवार, श्रीजीत साळोखे,संग्राम जरग, शेखर पोवार, गुरू लाड, विशाल भोंगाळे आदी उपस्थित होते.