आदिल फरास साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भव्य “कोल्हापूर थाळी”चे आयोजन
schedule06 May 26 person by visibility 6 category

कोल्हापूर :आवाज इंडिया प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कोल्हापूर शहर यांच्या वतीने मा. आदिल फरास साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. “कोल्हापूर थाळी” उपक्रमासोबतच नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा विचार करून टोपी व हँडग्लोजचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमादरम्यान सामाजिक बांधिलकी जपत गरजू व नागरिकांना साहित्याचे वितरण करण्यात आले.
या वेळी समीर पटवेगार, रऊफ पटवेकर, नजीर तांबोळी, अमित कल्याणकर, कपिल भाई, जावेद पटवेगार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी व आजी-माजी नगरसेवकांनीही कार्यक्रमास हजेरी लावली.
उपस्थितांनी मा. आदिल फरास साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.