Awaj India
Register
Breaking : bolt
घरफोडी टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपी अटकेत, ८.५० लाखांचा मुद्देमाल जप्तआदिल फरास साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भव्य “कोल्हापूर थाळी”चे आयोजननगरसेवक आदिल फरास यांच्या वाढदिवसानिमित्त पांजरपोळ येथे चारा दानबाजार समितीच्या तीन संचालकांना 'कारण दाखवा' नोटीस; नातेवाईकांच्या नावे गाळा घेतल्याने अपात्रतेची टांगती तलवारआरोग्य समिती बैठकीत सदस्यांच्या ठोस सूचनांचा वर्षाव; ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत उपाययोजनांवर भरकोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिनकर आवळे यांची संघर्षमय वाटचालशिक्षण क्षेत्रातील ‘ज्ञानज्योती’ निमालीबुद्ध जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान व बौद्ध वधू-वर मेळावा; डिंगे फाउंडेशनचा उपक्रमगोकुळ’च्या इतिहासात गेल्या पाच वर्षात सर्वोत्तम कामगिरी संचालक मंडळाचे प्रसिद्धीपत्रकस्मार्ट सर्व्हिसेस'ने ऊसतोड कामगारांची नोंदणी अचानक थांबवली; महाराष्ट्र ऊस तोडणी संघटनेचा मुंबई मोर्चाचा इशारा

जाहिरात

 

घरफोडी टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपी अटकेत, ८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

schedule06 May 26 person by visibility 19 categoryगुन्हे

कोल्हापूर, (आवाज इंडिया): जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव व करवीर परिसरात सुरू असलेल्या चोरी व घरफोडीच्या मालिकेचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ८ लाख ५० हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुनीता उर्फ बारकी दगडू गोसावी (वय ३७), नानुबाई राजू गोसावी (वय ५०) यांच्यासह रिक्षाचालक अण्णासाहेब रुघप्पा चौगुले (वय ४६) व संजय सोमा सरवदे (वय ४१) यांचा समावेश आहे. 

पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाह, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व अतिष म्हेत्रे यांनी पथक तयार करून तपास सुरू केला होता. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. 

आरोपींकडून मोटर केबल, मोटर पंप, व्हायब्रेटर, अॅल्युमिनियम जॉब, सॅनिटरी साहित्य असा विविध प्रकारचा चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपींनी गोकुळ शिरगाव व करवीर पोलीस ठाणे हद्दीत एकूण ६ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. 

या कारवाईत प्रवीण पाटील, अनिकेत मोरे, सचिन जाधव, वसंत पिंगळे, संदीप पाटील, विनायक चौगुले, नवनाथ कदम, संजय हुंबे, अनिल जाधव, संजय पाडवळ, अरविंद पाटील, महेश आंबी आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या टोळीमागील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes