देशातील आघाडीच्या १५० संस्थामध्ये* *डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ*
schedule09 Jun 23 person by visibility 137 category

‘एनआयआरएफ’ रँकिंगमध्ये विद्यापीठाचे स्थान कायम
कसबा बावडा/ वार्ताहर
राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क अर्थात ‘एन.आय.आर.एफ.- 2023’ ची क्रमवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतीच जाहीर केली आहे. या क्रमवारीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने देशातील आघाडीच्या 150 शैक्षणिक संस्थांमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल व कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी ही माहिती दिली.
विविध निकषांवर उत्तम कामगिरी करणाऱ्या देशभरातील शैक्षणिक संस्थांची एन. आय.आर. एफ. क्रमवारी सन 2016 पासून केंद्रीय शिक्षण विभागाकडून जाहीर केली जाते. सुरुवातीपासूनच या क्रमवारीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने 101 ते 150 या बँड मध्ये आपले स्थान कायम राखले आहे. या क्रमवारीमध्ये यावर्षी देशभरातील 8,686 विद्यापीठे व संस्था सहभागी झाल्या होत्या. विद्यापिठातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, संशोधन कार्य, विद्यार्थी उत्तीर्णतेचे प्रमाण, मुलींचे प्रमाण, राज्याबाहेरील विद्यार्थ्यांची संख्या, विविध समाज घटकापर्यंत शिक्षण पोहचवण्यासाठी केलेले कार्य, विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांशी संवाद व समन्वय आदी विविध निकषांवर आधारित गुणांकनानुसार एन. आय.आर. एफ. रँकिंग जाहीर केले जाते. 2020 व 2021 मध्येही विद्यापीठाने एन. आय.आर.एफ. रँकिंगमध्ये 101 ते 150 या बँडमध्ये स्थान मिळवले होते.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची स्थापना 2005 मध्ये झाली असून गेल्या 18 वर्षात विद्यापीठाने विविध पातळ्यावर यशाची चढती कमान कायम ठेवली आहे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत मेडिकल कॉलेज, कॉलेज ऑफ फिजीओथेरपी, स्कूल ऑफ हॉस्पीटीलीटी, कॉलेज ऑफ नर्सिंग, कॉलेज ऑफ फार्मसी, स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेस आणि सेंटर ऑफ इंटरडीसीप्लेनरी स्टडीज या संस्थांच्या माध्यमातून ५७ हून अधिक अभ्यासक्रम शिकवले जातात.