+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustगोकुळ मार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विन्रम अभिवादन... adjustमहापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने अभिवादन adjustआ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील संभाजीनगर बस स्थानक कामाची पाहणी adjustभात व नाचणी विक्रीसाठी शेतकरी नोंदणीस 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ adjustतर के.पी. ना राधानगरी विधानसभेत परिवर्तन शक्य ? adjustकारखान्यासह विधानसभेच्या निवडणुकीत ए. वाय.यांना बाय-बाय? adjustदक्षिण विधानसभा मतदारसंघातील 24000 लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड adjustगोकुळ’ सहकार क्षेत्रातील आदर्श : महेंद्र पंडीत adjustभाजपा जिल्हा कार्यालयात विविध आघाडी मोर्चा कार्यकारणी जाहीर adjustदिव्यांगांची पेंशन वाढ करण्यासाठी शासन पात‌ळीवर प्रयत्न करणार : आ. पाटील
schedule03 Jan 23 person by visibility 799 categoryलाइफस्टाइल
पत्रकार दिनी समारंभात पुरस्कारांचे वितरण 
श्रीमंत शाहू महाराज प्रमुख पाहुणे, स्तंभलेखक सुधींद्र कुलकर्णी प्रमुख वक्ते

कोल्हापूर,
कोल्हापूर प्रेस क्लब ही कोल्हापूर शहरातील पत्रकारांची मातृसंस्था म्हणून संपूर्ण राज्यभरामध्ये ओळखली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदा २०२० आणि २०२१ या दोन वर्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले पत्रकार, छायाचित्रकार कॅमेरामन यांचा गौरव करण्यात येणार आहे. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून पत्रकारांच्या गौरव समारंभात खंड पडला होता. मात्र यंदा दोन्ही वर्षांचे एकत्रित पुरस्कार घोषित करण्यात आले. २०२० सालच्या पुरस्कारामध्ये मुद्रित माध्यमातून लोकमतचे समीर देशपांडे यांना, तसेच छायाचित्रकार म्हणून लोकमतचे आदित्य वेल्हाळ, तर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दुर्वा दळवी यांना २०२० सालचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्याचबरोबर सन २०२१ साठी मुद्रित माध्यमातून पुढारीचे एकनाथ नाईक आणि लोकसत्ताचे दयानंद लिपारे यांना विभागून पुरस्कार जाहीर झाला. तसेच लोकमतचे छायाचित्रकार नसीर अत्तार तर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून शेखर पाटील यांना २०२१ सालचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षीपासून आरोग्यदूत स्वर्गीय रोहन जीवनराव साळुंखे यांच्या स्मरणार्थ लक्षवेधी पुरस्कार दिला जाणार आहे. यंदाचा हा पुरस्कार सकाळचे वार्ताहार सदानंद पाटील यांना घोषित करण्यात आला आहे. कोल्हापूर प्रेस क्लबच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज उपस्थित राहणार आहेत. तर स्तंभलेखक सुधींद्र कुलकर्णी यांचे 'सद्यस्थिती आणि पत्रकारितेसमोरील आव्हाने' या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार हसन मुश्रीफ यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी सहा वाजता दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री यांनी केले आहे.