Awaj India
Register
Breaking : bolt
तुझको मिरची लगी तो मै क्या करू आय ट्रिपल ई’ च्या माध्यमातून* *संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा*एस.व्ही.सी. को-ऑपरेटिव्ह बँकेकडून माझ्यावर अन्याय शिवसेना, जनसुराज्य पक्षाची भूमिका मांडणारे मुश्रीफ कोण 14 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेला श्रीलंका,थायलंड,जपान, नेपाळ आदी देश विदेशातील बौद्ध धर्मगुरूंशी संवाद गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इस्पूर्ली पोलिसांची मोठी कारवाई: आगमन व विसर्जन मार्गावर शांतता काळातील आवाजाचे 'नील पंचनामे' पूर्ण*महिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान: लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर* करवीर पंचायत समितीसमोर आंदोलनाचा इशारा:गोकुळमध्ये राष्ट्रवादीच ‘मोठा भाऊ’; जागावाटपाचा तिढा चर्चेतून सुटेल : हसन मुश्रीफकास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड;

जाहिरात

 

मानलं तर प्रेम आहे अन्यथा काहीच नाही...

schedule05 Mar 25 person by visibility 1539 categoryलाइफस्टाइल

 
घरातून पाय बाहेर काढत असताना मांजराचे पिल्लू सातत्याने पायाजवळ येऊन ओरडत होतं. म्हटलं पाच वाजल्यापासून याला दोन वेळा दूध पाजले तरीसुद्धा पायाजवळ येऊन का ओरडत आहे. स्वयंपाक खोलीत जाऊन मांजराचे भांडे चेक केले. त्याच्यामध्ये पुन्हा जाऊन दूध घेतलं. मी गेल्यानंतर त्याची भूक भागेल म्हणून ; पण पुन्हा एकदा माझ्या पाया जवळ येऊन मायेने ते ओरडत होतं.
 
आई गावाला गेली होती. मी सुद्धा बाहेर पडत होतो. घरात कोणच नव्हतं ते मांजर मला ओरडून सांगत होतं, 'घरात कोण नाही की,दूध संपल्यानंतर माझं काय.' परवाच मला आई बाहेर जाताना सांगून गेली होती 'मी वस्तीला बाहेर जाणार आहे, 'ये आणि मांजराला दूध पाज.'
 
मांजराला दूध नाही दिलं असतं तर प्राण्यांचं कोर्ट माझ्यासमोर येऊन कधीच उभा राहिले नसतं, मला त्यांनी जाब सुद्धा विचारला नसता, मी माझ्या कर्तव्यात कसूर ठेवले म्हणून एखादी शिक्षा सुद्धा सुनावली नसती. मांजराला दूध न पाजल्याबद्दल मला कोणीही याचा जाब विचारला नसता.
मांजराने सुद्धा दूध नाही पाजले नाही म्हणून बदला घेतला नसता. आपल्या सहकाऱ्यांना आपले दुःख सांगून माझ्या विरुद्ध एखादा मोर्चा सुद्धा काढला नसता. दूध नाही पाजलं म्हणून जाता जाता मालकाचे नुकसान करावे असा विचार सुद्धा त्यांनी केला नसता. मात्र आपुलकी आहे म्हणून दोघांनीही चांगली कर्तव्य पार पाडली. 
 
 माणूस हा मायाळू आणि बुद्धीजीवी आहे. त्याच्याजवळ कधीही न आठणारा प्रेमाचा झरा असतो. तो कितीही ओतला तरी तो कधीच संपत नाही. माणसा भोवती असणारी त्याचे नातलग, मित्रपरिवार, प्राणी असेल तो प्रेम करत राहतो. आईने सुद्धा तेच केलं मांजर एकटे पडू नये म्हणून मला त्याला दूध पाजण्याचा सल्ला दिला. मांजराने सुद्धा पायाजवळ ओरडून आपलं आपुलकीचं नातं आहे हा सांगण्याचा प्रयत्न केला.
सांगायचा उद्देश एवढाच मानलं तर खूप काही आहे आणि मानलं तर काहीच नाही. फक्त प्रेमाचा झरा इतरांसाठी खुला करायचा तो बंद करून ठेवायचा हा आपल्या आपण विचार करायचा.
प्रेमाची नाती जोडताना असाच विचार केला जातो की आपण सर्वजण प्रेमाने राहूया एक वेगळा आदर्श निर्माण करून देऊया. प्रेमाच्या बाबतीत सुद्धा असंच आहे मानलं तर प्रेम आहे; अन्यथा आपुलकीचं नातं नाही. याबद्दल कोणीही जाब विचारणार नाही.
 
प्रशांत चुयेकर 
9765024443,8788213076 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes