Awaj India
Register
Breaking : bolt
​इस्पुर्ली पोलिसांची धडक कारवाई; निगवे खालसा येथे अवैध हातभट्टी दारू अड्डयावर छापा, तिघांवर गुन्हा दाखल​स्वप्नपूर्ती जिल्हा सहकारी गृहतारण संस्थेकडून 'शैक्षणिक कर्ज योजना' सुरू; पालकांना मोठा दिलासाकोल्हापुरात “कॉकरोच जनता पार्टी”ला महाराष्ट्र बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा; २९ मे रोजी मेळावागोकुळ निवडणूक महायुती म्हणूनच लढणार; पक्षात कोणतीही फूट नाही – मंत्री हसन मुश्रीफगोकुळ निवडणुकीचे रणांगण तापले; सतेज पाटील यांचे दूध उत्पादकांना आवाहन,कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी (KMRDA) १ जून रोजी दसरा चौकात लाक्षणिक उपोषणश्रीमती सरस्वती तुकाराम यादव यांचे निधनजागतिक पर्यावरण दिनानिमित्त कृती फाउंडेशनतर्फे “पर्यावरण गौरव पुरस्कार” सोहळ्याचे आयोजनशिक्षकेतर कर्मचारी समायोजन विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार : राजेंद्र कोरेडॉ. शरद गायकवाड प्रबुद्ध इंटरनॅशनल संस्थेचा भिमस्फूर्ती पुरस्काराने सन्मानित

जाहिरात

 

हनुमान पतसंस्थेची भरारी; १.८५ कोटींचा ढोबळ नफा- चेअरमन बळवंत पाटील मास्तर

schedule10 Apr 26 person by visibility 203 category

कोल्हापूर : हनुमान सहकारी पतसंस्थेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १ कोटी ८५ लाख रुपयांचा ढोबळ नफा कमावला आहे. तसेच निव्वळ नफा १ कोटी ५२ लाख रुपये झाल्याची माहिती संस्थापक चेअरमन बळवंत पाटील (मास्तर) यांनी दिली.
संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना पाटील यांनी सांगितले की, या वर्षात संस्थेची आर्थिक स्थिती अधिक भक्कम झाली असून सर्वच घटकांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. संस्थेचे भागभांडवल १ कोटी ३६ लाख १० हजार रुपये इतके असून, ठेवींचा आकडा १०७ कोटी ७ लाख ४२ हजार ५०४ रुपये इतका झाला आहे.
याशिवाय, संस्थेने ८५ कोटी ३५ लाखांचे कर्ज वितरण केले असून, ३८ कोटी ८७ लाखांची गुंतवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संस्थेची वार्षिक उलाढाल तब्बल ४७५ कोटी रुपये इतकी झाली आहे.
मुख्य व्यवस्थापक भिमराव फिरींगे यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
ही यशस्वी घोडदौड संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, कर्मचारी व सभासद यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शक्य झाली असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
यावेळी चेअरमन तानाजी पाटील, संचालक प्रशांत पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व संचालक मंडळ उपस्थित होते.
संस्थेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून, भविष्यातही अशीच प्रगती कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes