Awaj India
Register
Breaking : bolt
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कृती फाउंडेशनतर्फे “पर्यावरण गौरव पुरस्कार” सोहळ्याचे आयोजनशिक्षकेतर कर्मचारी समायोजन विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार : राजेंद्र कोरेडॉ. शरद गायकवाड प्रबुद्ध इंटरनॅशनल संस्थेचा भिमस्फूर्ती पुरस्काराने सन्मानितडॉ. संजय डी. पाटील यांचा* *‘सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड' ने सन्मान*कोल्हापूर महापालिकेच्या विशेष सभेत एलईडी पथदिवे प्रकरणी मोठा निर्णयसांगलीत ५ एप्रिलला लहान मुलांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरपरप्रांतीय कामगारांची वैयक्तिक माहिती संकलित करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) यांची जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणीदिव्यांग पेन्शनसाठी ‘प्रहार’ आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चादहावीनंतर डिप्लोमा इंजीनियरिंग हा करिअरचा उत्तम पर्याय - डॉ. महादेव नरके*आज डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन*

जाहिरात

 

शिक्षकेतर कर्मचारी समायोजन विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार : राजेंद्र कोरे

schedule23 May 26 person by visibility 15 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  आवाज इंडिया प्रतिनिधी : 
राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचार्यांचे माध्यमिक शाळांमध्ये समायोजन करण्याच्या आदेशा विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये याचिका दाखल करणार असल्याचे, महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैठकीत बोलताना  स्पष्ट केले.
      राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांतील लिपिक व सेवकांचे समायोजन त्याच संस्थेच्या माध्यमिक शाळांमध्ये करण्याचे आदेश 17 एप्रिल 2026 रोजी राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. सदरच्या कर्मचाऱ्यांची पदे ही एकाकी पदे असून, गतवर्षीच्या  संचमान्यते अखेर सदरची पदे कार्यरत दाखविण्यात आली. सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे सेवानिवृत्ती पर्यंत त्याच प्राथमिक शाळेत कार्यरत ठेवावीतअशी मागणी याचिकेत करण्यात येणार आहे.
      महासंघाच्या पुणे शाखेच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.महासंघाच्या कोल्हापूर,सांगली, सातारा,सोलापूर या शाखांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये याचिका दाखल करण्यात येणार आहे.
    बैठकीला महासंघाचे राज्यसचिव राजेंद्र कोरे राज्य सल्लागार एम.डी.पाटील, उपाध्यक्ष प्रदीप,मगदूम, जिल्हा शिक्षकेतर प्रमुख सागर जाधव, शहर शिक्षकेतर प्रमुख अर्जुन चाफोडीकर, गीता चव्हाण, सुचिता अग्निहोत्री, रूपाली कुलकर्णी, दिपाली जोशी, संजय चव्हाण 3 उदय चिंदके, जितेंद्र पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes