Awaj India
Register
Breaking : bolt
श्रीमती सरस्वती तुकाराम यादव यांचे निधनजागतिक पर्यावरण दिनानिमित्त कृती फाउंडेशनतर्फे “पर्यावरण गौरव पुरस्कार” सोहळ्याचे आयोजनशिक्षकेतर कर्मचारी समायोजन विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार : राजेंद्र कोरेडॉ. शरद गायकवाड प्रबुद्ध इंटरनॅशनल संस्थेचा भिमस्फूर्ती पुरस्काराने सन्मानितडॉ. संजय डी. पाटील यांचा* *‘सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड' ने सन्मान*कोल्हापूर महापालिकेच्या विशेष सभेत एलईडी पथदिवे प्रकरणी मोठा निर्णयसांगलीत ५ एप्रिलला लहान मुलांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरपरप्रांतीय कामगारांची वैयक्तिक माहिती संकलित करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) यांची जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणीदिव्यांग पेन्शनसाठी ‘प्रहार’ आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चादहावीनंतर डिप्लोमा इंजीनियरिंग हा करिअरचा उत्तम पर्याय - डॉ. महादेव नरके*

जाहिरात

 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कृती फाउंडेशनतर्फे “पर्यावरण गौरव पुरस्कार” सोहळ्याचे आयोजन

schedule23 May 26 person by visibility 13 categoryशैक्षणिक

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कृती फाउंडेशनतर्फे “पर्यावरण गौरव पुरस्कार” सोहळ्याचे आयोजन
कोल्हापूर : पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी कृती फाउंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “पर्यावरण गौरव पुरस्कार २०२६” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ दि. ५ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणार आहे.
पर्यावरण विषयावर सातत्याने कार्य करणारे शिक्षक, सामाजिक संस्था, शासकीय अधिकारी-कर्मचारी, पत्रकार तसेच पर्यावरण जनजागृती, वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, स्वच्छता, प्लास्टिकमुक्त अभियान आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविणारे पर्यावरणप्रेमी यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
पर्यावरण क्षेत्रात केलेले कार्य समाजापुढे यावे आणि प्रेरणादायी उपक्रमांचा गौरव व्हावा, या उद्देशाने हा पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती कृती फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली.
इच्छुकांनी आपला परिचय, छायाचित्र आणि पर्यावरण विषयक कार्याची माहिती युनिकोड मराठीत व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 9765024443 वर पाठवावी. अधिक माहितीसाठी 8263953044 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes