Awaj India
Register
Breaking : bolt
शिक्षकेतर कर्मचारी समायोजन विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार : राजेंद्र कोरेडॉ. शरद गायकवाड प्रबुद्ध इंटरनॅशनल संस्थेचा भिमस्फूर्ती पुरस्काराने सन्मानितडॉ. संजय डी. पाटील यांचा* *‘सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड' ने सन्मान*कोल्हापूर महापालिकेच्या विशेष सभेत एलईडी पथदिवे प्रकरणी मोठा निर्णयसांगलीत ५ एप्रिलला लहान मुलांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरपरप्रांतीय कामगारांची वैयक्तिक माहिती संकलित करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) यांची जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणीदिव्यांग पेन्शनसाठी ‘प्रहार’ आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चादहावीनंतर डिप्लोमा इंजीनियरिंग हा करिअरचा उत्तम पर्याय - डॉ. महादेव नरके*आज डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन*राष्ट्रीय सबज्युनिअर बेसबॉल स्पर्धेकरीता कु.स्वराज रुपेश सागर ची ओडिसा येथे निवड

जाहिरात

 

डॉ. शरद गायकवाड प्रबुद्ध इंटरनॅशनल संस्थेचा भिमस्फूर्ती पुरस्काराने सन्मानित

schedule23 May 26 person by visibility 8 categoryशैक्षणिक

लंडन आवाज इंडिया प्रतिनिधी : 
सातारा जिल्ह्यातील अंगापूर सारख्या ग्रामीण भागातून आंबेडकरी विचाराची ज्योत थेट लंडन पर्यंत पोहोचवणाऱ्या डॉ. शरद गायकवाड यांना जागतिक दर्जाची संस्था प्रबुद्ध इंटरनॅशनल नुसते मार्फत भिमस्फूर्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.प्रोफेसर डॉक्टर जे रेमिक व डॉक्टर एस एस बहेल यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला.
     पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये परिवर्तनवादी विचारांची कास पकडणाऱ्या घटनाकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर, वीर लहुजी वस्ताद, मुक्ता साळवे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत रविदास व पीरियार रामास्वामी अशा महान युगपुरुषांच्या महत्त्व व तत्व त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. आजही पुरोगामी चळवळीशी एकनिष्ठ असणारे डॉ .गायकवाड यांनी अनेक दलित पददलित समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. गेले तीस ते पस्तीस वर्षांमध्ये त्यांनी पोतराज प्रथा नष्ट करण्यासाठी स्वतःपासूनच सुरुवात करून अनेकांना मुक्तीचा मार्ग दाखवला.
                              डॉ शरद गायकवाड हे गेली ३०-३५ वर्षे महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या विचारांचा प्रसार  करण्याचे काम आपल्या वाणी लेखणी द्वारे करीत आलेले आहेत. पोतराज प्रताजता निर्मूलनासाठी विशेष प्राधान्याने त्यांनी ३४ पोतराजांच्या जटांचे निर्मूलन केलेले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती अभियान, संविधान साक्षरता आणि संविधानाचा प्रसार प्रचार या शिवाय बहुजन समाजामध्ये डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरवाद रुजवण्यासाठी ते अथक परिश्रम घेत आहेत. त्यांच्या या संपूर्ण सामाजिक कार्याचा विचार करून प्रबुद्ध इंटरनॅशनल संस्था, लंडन यांनी त्यांना भिम स्फूर्ती हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. याबद्दल त्यांचे महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांकडून व पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांकडून सर्वत्र अभिनंदन होत आहे. आपल्या वैचारिक भूमिकेने शरदाचे चांदणे पसरवणाऱ्या या नेत्याला अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes