राष्ट्रीय सबज्युनिअर बेसबॉल स्पर्धेकरीता कु.स्वराज रुपेश सागर ची ओडिसा येथे निवड
schedule16 May 26 person by visibility 152 categoryशैक्षणिक
आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूरः शां. कृ.पंत वालावलकर हायस्कूल मुक्त सैनिक येथील 8वी मध्ये शिकणारा स्वराज सागर यांची 31वी सबज्युनिअर राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा किट विद्यापीठ भुवनेश्वर ओडिसा येथे दि.24 ते 29 मे 2026 रोजी पार पडणाऱ्या स्पर्धेस झाली.
राज्यस्तर सबज्युनिअर बेसबॉल स्पर्धा अमरावती येथे पार पडली होती त्यात कोल्हापूर संघ तृतीय क्रमांकने विजयी झाला होता स्वराची निवड पार पडलेल्या राज्य स्पर्धेतून झाली
दि. 14 ते 20 मे 2026 अनिकेत इंग्लिश मिडियम स्कूल बारामती येथे स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबीर होत आहे.
स्वराज ला शाळेच्या मुख्याध्यापिका मा.वृषाली कुलकर्णी, उपमुख्याध्यापक मा. आर.पी.मोरे,शिक्षक प्रतिनिधी श्री.अनिल चव्हाण यांचे प्रोत्साहन लाभले आणि क्रीडाशिक्षक राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ.राजेंद्र बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले