
भोगावती सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक
कोल्हापूर आवाज इंडिया (प्रशांत चुयेकर)
भोगावती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील यांच्या गटात, विरोधक
शेतकरी कामगार पक्षाची तरुण पिढी 'क्रांती' करणार असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी कामगार पक्ष 'संपत' आला आहे अशी टीका होत असली तरी या विरोधात 'क्रांती' करण्याचा निर्णय तरुणांनी घेतला आहे.
माजी आमदार संपतराव पवार पाटील यांचा मुलगा क्रांती पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलची रचना केली जात आहे.भाऊ अक्षय अशोकराव पाटील यांच्यासह अनेक उमेदवारांचे अर्ज त्यांच्या नेतृत्वाखाली भरण्यात आले. कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोकराव पाटील यांनी मात्र आपले समर्थक घेत अर्ज भरला आहे.तर त्यांचा मुलगा अक्षय पाटील यांनी भाऊबंद यांच्यासह तरुण मुलांना एकत्र करत अर्ज भरला आहे.
क्रांती पाटील यांनी जेष्ठ नेते शिक्षण प्रसारक मंडळाचे
माजी अध्यक्ष केरबा पाटील यांच्यासह सहकाऱ्यांना घेत आपल्या कार्यकर्त्यांना न्याय कसा मिळेल याची धडपड सुरू केली आहे.
सध्या या कारखान्याची परिस्थिती बिकट आहे.हा कारखाना सुरळीत चालावा यासाठी आर्थिक सहाय्य जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून मिळू शकते.कारखान्यासाठी काढलेले 213 नोकरदारांचे कर्ज फिटू शकते असा विचार क्रांती पाटील , केरबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी मांडला आहे. यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आमदार पी. एन पाटील संचालक ए. वाय. पाटील यांची मदत आपल्याला होऊ शकते म्हणून त्यांना मदत करावी त्यांच्याबरोबर जावावे असा विचार क्रांती पाटील यांच्या गटातील तरुणांनी मांडला आहे.याबाबत संचालक ए. वाय.पाटील यांच्याबरोबर एक बैठक झाली आहे.
माजी आमदार संपतराव पवार पाटील, माजी उपाध्यक्ष अशोकराव पाटील यांच्याबरोबर असणारे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते यांनी सत्ताधारी मंडळाच्या वर टीका केली आहे. त्यांच्यामुळे कारखाना कर्जबाजारी झाला असल्याची टीका करत सर्वपक्षीय एकत्रित त्यांच्या विरोधात निवडणूक लढवू या असा विचार केला आहे.
अर्ज भरताना सुद्धा पवार पाटील घराण्यातील तरुण मंडळ व कार्यकर्ते यांनी अक्षय पाटील यांच्यासह इतरांचा फॉर्म शक्ती प्रदर्शनाने भरला.या उलट माजी उपाध्यक्ष अशोकराव पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेत स्वतःचा अर्ज भरला. यामुळे घरातीलच ज्येष्ठ मंडळींच्या विरोधात तरुण मंडळी उभा असल्याचे चित्र निर्माण झालं असल्याची चर्चा कार्यकर्त्यांच्या मधून ऐकायला मिळत आहे.
याबाबत क्रांती पाटील यांना विचारले असता आम्ही सर्वजण एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितले.