Awaj India
Register
Breaking : bolt
राज्यस्तरीय आदर्श समाजभूषण प्रेरणा पुरस्काराने सचिन कदम यांचा गौरव*डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे नोकरी मेळाव्यात ११८ उमेदवारांची प्राथमिक निवड*कोल्हापूर मंडळात ६,५९२ बूथवर ६.२२ लाखांहून अधिक बालकांना पोलिओ डोसपुण्यसृष्टी प्रकल्प : अतिक्रमण काढण्याचे आदेश *डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे* *आजपासून दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प*माहिती अधिकार नियम २०२६ विरोधात राज्यभर आंदोलनाचा इशारा१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक;* डॉ. महादेव नरके यांचे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी दिशादर्शक – डॉ. संजय डी. पाटील*डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये* *१२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया*नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्याच्यावर कारवाई करा

जाहिरात

 

मराठवाड्यात ‘गोकुळ’ ची दूध व दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करणार; नविद मुश्रीफ

schedule07 Aug 25 person by visibility 1172 categoryआरोग्य


कोल्हापूर, ता.०७ : कोल्हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या, (गोकुळ) चे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक यांची मराठवाड्यातील उजना मिल्क प्रोडक्टस् प्रायव्हेट लि. सुनेगाव (सांगवी) ता.अहमदपूर जि.लातूर या दूध संघास बुधवार दि.०६/०८/२०२५ इ.रोजी सदिच्‍छा भेट दिली. या भेटीदरम्यान अहमदपूरचे माजी आमदार बाळासाहेब जाधव आणि अविनाश जाधव यांनी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक यांचे स्वागत व सत्कार केला.

यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले कि, राज्यातील मुंबई-पुणे परिसरासह मराठवाडा विभागातूनही गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, गोकुळ दूध संघाच्या व्यवस्थापनाने लातूर आणि नांदेड परिसरातील स्थानिक दूध संघांची भेट घेऊन प्रत्यक्ष आढावा घेतला. सहकार मंत्री व उजना मिल्कचे चेअरमन नामदार बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या उजना मिल्क या दूध संघाच्या माध्यमातून गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ या भागांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच या विभागांतही गोकुळचे दूध व दर्जेदार उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत.

भेटीदरम्यान श्री.मुश्रीफ यांनी डेअरीतील विविध यंत्रणा, कार्यपद्धती आणि तांत्रिक सुविधांची सविस्तर पाहणी केली. दूध संकलन प्रक्रियेची सखोल माहिती डेअरीचे मॅनेजर संदीप पाटील यांनी दिली.

या प्रसंगी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, अहमदपूरचे माजी आमदार बाळासाहेब जाधव, गोकुळचे संचालक युवराज पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, प्रा. किसन चौगले, बिद्री साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन मनोज फराकटे, अविनाश जाधव, सुरज पाटील, संचालक डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, वरिष्ठ दूध संकलन अधिकारी सर्जेराव पाटील व मार्केटिंग अधिकारी शिवाजी चौगले यांची उपस्थित होत.


 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes