Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पी. साळोखेनगर मध्ये रविवारी "सतेज मॅथ्स स्कॉलर" परीक्षेचे आयोजन*डी.वाय. पाटील च्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट चुये येथे आज पासून श्री दत्त जयंती सोहळा महापुरुषांचे विचार शालेय अभ्यासक्रमात असावेत : कौस्तुभ गावडे कर्तृत्ववान मुख्याध्यापिका सौ. सुहासिनी उदय कदम यांचा प्रेरणादायी प्रवासआदर्श व्यक्तिमत्व मुख्याध्यापक आत्माराम विश्वनाथ सोनोने धनश्री मोहिते विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाची उज्ज्वल परंपरा आदर्श शिक्षक जनार्दन मधुकर कांबळे सर : विद्यार्थ्यांच्या घडवणुकीसाठी समर्पित कार्यशैलजा पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी सुनंदा प्रकाश मुसळे : सेवेतून आदर्श घडवणाऱ्या शिक्षिका

जाहिरात

 

*डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*

schedule19 Jun 25 person by visibility 480 categoryआरोग्य

कोल्हापूर;
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्यावतीने शनिवार दि. २१ जून २०२५ रोजी ‘डायबेटिक फूट’वर एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. डायबेटिक फूट सोसायटी ऑफ इंडीया (DFSI) यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या चर्चासत्रात नामवंत डॉक्टर्स मार्गदर्शन करणार आहेत.

   भारतामध्ये  मधुमेहाचे प्रमाण वाढत असून त्यामुळे डायबेटिक फूटच्या जखमा, गँगरीन, अपंगत्वच्या समस्या वाढत आहेत.  या सामाजिक व वैद्यकीय प्रश्नाला उत्तर शोधण्यासाठी व कोल्हापूर परिसरातील वैद्यकीय व्यावसायिकांसोबत याबाबतचे अद्ययावत  ज्ञान शेअर करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

   डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या  सर्जरी, मेडिसिन, अस्थिरोग आणि अनाटॉमी या विभागांनी एकत्र येऊन डायबेटिक फूट सोसायटी ऑफ इंडीया (DFSI) यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेमध्ये मुंबई येथील ख्यातनाम डॉ. अरुण बाळ, डॉ. संजय वैद्य, डॉ. मिलिंद रूके, डॉ. शैलेश रानडे तसेच हैद्राबाद येथील डॉ. श्रीनिवास हे मार्गदर्शन करतील. वैद्यकीय महाविद्यायातील पदव्युत्तर विद्यार्थी व प्राध्यापक यांचाही या चर्चा सत्रात सहभाग असेल.

 डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नेर्ली, उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालाप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सहयोगी प्राध्यापक डॉ. अमित बुरांडे यांनी दिली. 

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes