महाराष्ट्र एक्सप्रेस पुनश्च पूर्ववत
schedule08 Sep 22 person by visibility 267 categoryसामाजिक
महाराष्ट्र एक्सप्रेस पुनश्च पूर्ववत
असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर ते गोंदिया दरम्यान धावणारी गाडी क्रमांक ११०३९ व गोंदिया ते कोल्हापूर धावणारी गाडी क्रमांक ११०४० पुनश्च पूर्ववत चालू झाली आहे.
नागपूर विभागात नागपूर स्टेशन ते गोंदिया स्टेशन दरम्यान असणाऱ्या कांचीवाडी स्थानक येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग चे काम सुरू असल्याने १सप्टेंबर पासून ही गाडी कोल्हापूर ते नागपूर अशी धावत होती व परतीचा मार्ग सुद्धा नागपूर ते कोल्हापूर असाच होता .पण आता इलेक्ट्रॉनिक लॉकिंग चे काम पूर्ण झाल्याने आजपासून पुनश्च ही गाडी पूर्ववत चालू झाली आहे अशी माहिती कोल्हापूर स्टेशन प्रबंधक विजयकुमार यांनी दिली.