दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवत कौस्तुभ गावडे यांचा साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल
schedule05 Oct 26 person by visibility 10 categoryशैक्षणिक
शक्तिप्रदर्शन टाळत सहकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज; शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळात प्रभावी आवाज उठविण्याचा निर्धार
पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार तथा शिक्षक मित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी सोमवारी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच विविध भागांतील गंभीर परिस्थितीची जाणीव ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कोणतेही मोठे शक्तिप्रदर्शन न करता स्वेच्छेने उपस्थित राहिलेल्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत गावडे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी महायुतीतील विविध नेते, पदाधिकारी, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अर्ज दाखल करताना महिला शिक्षकांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका कौस्तुभ गावडे यांनी यावेळी मांडली. शिक्षकांची सेवा सुरक्षा, शैक्षणिक धोरणे, शिक्षकांचे हक्क आणि विविध प्रलंबित प्रश्नांसाठी विधिमंडळात प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
“ही निवडणूक केवळ राजकीय प्रक्रिया नसून शिक्षकांच्या प्रश्नांना सक्षम प्रतिनिधित्व मिळवून देण्याची संधी आहे,” अशी भूमिका गावडे यांनी व्यक्त केली. शिक्षकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी राजेश पांडे, आमदार महेश लांडगे, आमदार हेमंत रासने, आमदार भीमराव तापकीर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिळीमकर, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, डॉ. राजेंद्र शेजवळ, आजीव सेवक आर. के. भोसले, विद्या समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीराम साळुंखे, हातकणंगले पंचायत समितीचे सभापती यशवंत माने, संस्थेचे सहसचिव एस. एम. गवळी, पुणे विभागाचे विभागप्रमुख अनिल साकोरे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे नेते, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि महिला शिक्षक स्वेच्छेने उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोठे शक्तिप्रदर्शन टाळून साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याने गावडे यांच्या भूमिकेची चर्चा शिक्षक वर्तुळात होत आहे.