Awaj India
Register
Breaking : bolt
हनुमान पतसंस्थेची भरारी; १.८५ कोटींचा ढोबळ नफा- चेअरमन बळवंत पाटील मास्तरआरोग्य विज्ञान क्षेत्राला अधिकाधिक संशोधनाची गरज - ब्रिगेडिअर डेचेन चोएडेन*जैवतंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनाभिमुख दृष्टीकोन आवश्यक – डॉ. एस. आर. यादव* *कोडोली (ता. पन्हाळा) येथे प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी संयुक्त धडक कारवाई*डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा* *ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार*जिल्हास्तरीय युवा पुरस्कार; ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ* कुडीत्रे येथे ‘तालुकास्तरीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा’ उत्साहात संपन्न**डी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा* *'ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप' प्रथम*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना* *’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार* -*डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये* *'वूमन इन लीडरशिप' कार्यक्रम उत्साहात*

जाहिरात

 

वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन*

schedule16 Jun 25 person by visibility 621 categoryशैक्षणिक

*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* 
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात बोन्साय आर्ट कार्यशाळा 
 
एखाद्या वनस्पतीची वाढ होण्यासाठी मुळांचे आरोग्य अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे मुळांवर काम करा. असे आवाहन डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) के. प्रथापन यांनी केले. विद्यापीठात कृषी अभियांत्रिकी विभागाच्यावतीने आयोजित बोन्साय आर्टवर प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  
 
  डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. निशांत कडगे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. बोन्सायच्या विविध शैली आणि छाटणीचे तंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना सखोलपणे समजावले. सहभागी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृती करात सुंदर-सुंदर बोन्साय तयार करण्यासाठी झाडांची तंत्रशुद्ध छाटणी केली. 
 
  दरम्यान, सोमवार दि. २१ एप्रिल रोजी कृषी अभियांत्रिकी विभागाच्यावतीने पालक-शिक्षक मेळावा संपन्न झाला. सहयोगी अधिष्ठाता डॉ. मंगल पाटील शैक्षणिक प्रगती संदर्भात सादरीकरण केले.
 
अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पालकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी शैक्षणिक व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. 
 
प्रस्तावना डॉ. मंगल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. विनायक शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेसाठी डॉ. संकेत सावंत, श्री. दीपक शिंदे यांनी मेहनत घेतली. द्वितीय वर्षाच्या गिरीजा खोत आणि प्रतिक्षा साळोखे यांनी सूत्रसंचालन केले. 
 
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कुलगुरू प्रा. (डॉ.) के. प्रथापन, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुहास पाटील, कुलसचिव प्रा. (डॉ.) जयेंद्र खोत, वित्त अधिकारी सुजित सरनाईक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. 
 
*तळसंदे-* प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसमवेत डॉ. मंगल पाटील, डॉ. निशांत कडगे, डॉ. विनायक शिंदे व प्राध्यापक.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes