Awaj India
Register
Breaking : bolt
निष्ठावंत भीमसैनिकांचा देशसेवेकडे गौरवशाली प्रवासआदर्श शिक्षिका व प्रेरणादायी जीवनप्रवास : सौ. श्रीदेवी समाधान खिलारे२५ वर्षांचा शिक्षण व समाजसेवेचा प्रदीर्घ प्रवास : मनीषा बाळासाहेब कणसे पाटील यांचे प्रेरणादायी कार्यआदर्श शिक्षिका व समाजसेविका तेजस्वीनी संजय सिंह देसाई यांचे प्रेरणादायी कार्यसामाजिक बांधिलकीतून आदर्श कार्य; अनंतमती विशाल शेटे यांचे उल्लेखनीय योगदानमैत्री दुनियेतील राणी – रूपाली पाटीलडी. वाय. पी. साळोखेनगर मध्ये रविवारी "सतेज मॅथ्स स्कॉलर" परीक्षेचे आयोजन*डी.वाय. पाटील च्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट चुये येथे आज पासून श्री दत्त जयंती सोहळा महापुरुषांचे विचार शालेय अभ्यासक्रमात असावेत : कौस्तुभ गावडे

जाहिरात

 

प्रवेश पत्रात चूक झालेल्या "त्या" विद्यार्थ्यांनाही देता येणार बारावीची परीक्षा"*

schedule09 Feb 25 person by visibility 524 categoryशैक्षणिक

 
• *पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व सचिव सुभाष चौगुले यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांचे नुकसान टळले*
 
• *विमला गोयंका कॉलेजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा*
 
• *विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात अभ्यास करण्याचे आवाहन* 
 
कोल्हापूर, दि. 9 (जिमाका): येथील विमला गोयंका कॉलेजने आय. टी. , कॉम्प्युटर सायन्स आणि क्रॉप सायन्स या विषयांची मंडळ मान्यता न घेता इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांकडून या विषयांचे फॉर्म भरुन घेतले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर या विषयांचे हॉल तिकीट (प्रवेश पत्र) मिळाले नाही. परंतू या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या होत्या. यानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राज्य मंडळाशी संपर्क करुन तातडीने पाठपुरावा केला. 
 
     राज्य मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विहित दंडात्मक शुल्क आकारुन विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांची त्या त्या विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्याबाबत संबंधित कॉलेजला सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित कॉलेजमधील कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याबाबतची दक्षता मंडळामार्फत घेण्यात आली आहे.
 
     विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात अभ्यास करावा. विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल व ज्यु कॉलेज मधील बारावीच्या या सर्व मुलांची परीक्षा घेण्यात येईल. पालकांनीही मुलांना विश्वास द्यावा. फॉर्म भरायचे राहिलेल्या विद्यार्थ्यांचे अतिविशेष अतिविलंब शुल्कासह फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कॉलेजमार्फत भरता येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.
 
 
     या कनिष्ठ महाविद्यालयात बारावीचे विज्ञान शाखेचे एकूण १४९ विद्यार्थी असून त्यापैकी ७० विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म कॉलेजने ऑनलाईन भरलेले नव्हते. फॉर्म भरलेल्या ७९ विदयार्थ्यांपैकी २६ विद्यार्थ्यांना विषयात दुरुस्ती हवी आहे.
 
कॉलेजने प्रीलिस्ट दुरुस्ती च्या वेळी विद्यार्थ्यांच्या फॉर्ममधील माहिती उदा. नाव, विषय, माध्यम, इत्यादी तपासून दुरुस्त्या करुन घेणे अपेक्षित होते. तसेच २० जानेवारी २०२५पासून सुधारित ऑनलाइन प्रवेश पत्र उपलब्ध करुन दिलेली माहिती तपासून, आवश्यक त्या दुरुस्त्या करुन घेणे अपेक्षित होते. तशी कार्यवाही कॉलेज कडून झाली नाही. या कनिष्ठ महाविद्यालयाने भरलेल्या फॉर्मनुसार बोर्डाने हॉल तिकीट दिली आहेत. यात शिक्षण मंडळाकडून कोणतीही चूक झालेली नाही, असे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी कळवले आहे.
    

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes