डी. वाय. पाटील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची*
schedule30 Dec 23 person by visibility 186 categoryक्रीडा
*
*नाणेघाट,शिवनेरी गड पदभ्रमंती मोहीम*
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने २३ व २४ डिसेंबर रोजी नाणेघाट, जीवधन, चावंड,शिवनेरी गड ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. डी.वाय.पी.सी.ई.टी अडव्हेंचर क्लबच्या सहकायनि आयोजित करण्यात आलेल्या या ट्रेकमध्ये ३० विद्यार्थिनी व ४४ विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नाणेघाट,जीवधन,चावंड,शिवनेरी गडांचा इतिहास, निसर्ग सोंदर्य,जीवसृष्टी ची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली व तसेच जीवधन व चावंड गडांवरती स्वच्छता मोहीमही राबवली.
सुमारे १८ किलोमीटरचा हा ट्रेक विद्याच्यांनी पूर्ण केला, पी 2 पी ट्रेकर्सचे अमित कोष्टी (इचलकरंजी) यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. अॅडव्हेंचर क्लब व राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा. योगेश चौगुले, सुदर्शन साळोखे,योगेश कुंभार आणि विनायक लांडगे हे उपस्थित होते. हा ट्रेक यशस्वी करण्यासाठी संकेत घाटगे, गौरव चौगले, अथर्व गगाने, तनिषा मदाने, पल्लवी पाटील श्रेया वाघ,अथर्व ढेरे विद्यार्थी समन्वयकांनी मेहनत घेतली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील,पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, डीन स्टुडंट अफेअर डॉ.राहुल पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
दिपाली सय्यद भोसले यांचा महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत घेतलेला पुढाकार कौतुकास्पद
schedule27 Apr 23 person by visibility 194 category
कोल्हापूर प्रतिनिधी
दिपाली सय्यद भोसले. महाराष्ट्र राज्य महिला केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने त्या चर्चेत आल्या आहेत. एक महिला म्हणून त्यांनी या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद आहे. राज्य व राज्याबाहेरील पैलवानांना एकत्र करत ही स्पर्धा कोल्हापुरात पार पाडण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केला.
महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्र राज्यातील कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहीली महाराष्ट्र चँपियन स्पर्धा १९५३ साली झाली त्यावेळी पुण्यातील नगरकर तालमीचे प्रसिद्ध पहिलवान तुकाराम नानासाहेब फाळके यांनी मुंबई गिरणी कामगारातील मोठा मल्ल गोगाचाच सिद्धपा यांना अवघ्या दोन मिनीटात झोळी डावावर चीतपट मारले.व पै.तुकाराम फाळके यांना महाराष्ट्र चँपियन (केसरी) ट्रॉफी देण्यात आली.
महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजक
विशेष म्हणजे त्या महिला आहेत. महिला पैलवानासाठी त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला आहे. भविष्यात त्यांच्या विकासासाठी एक भरीव कामगिरी करणार असल्याची सुद्धा त्या सांगत आहेत.
भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर नेमलेल्या अस्थायी समितीच्या परवानगीने व अभिनेत्री दिपाली सय्यद- भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महिलांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत तब्बल 150 पेक्षा आधी महिला पैलवानी सहभाग नोंदविला. यामध्ये यापूर्वीपेक्षा जास्त बक्षिसाची खैरात केल्यामुळेे सुद्धा या स्पर्धेला एक वेगळीच रंगत आली आहे. खासबाग मैदानामध्ये कुस्तीशौकीन महिलांच्या कुस्ती बघण्यासाठी लांबून येत आहेत.
तसं बघायला गेले कुस्ती म्हटलं की थोडा आता दुर्लक्ष झालेल्या भाग आहे. त्यातच महिला म्हटले की आणखीन दुर्लक्ष; मात्र या खेळाला जिवंतपणा देण्याचे काम दिपाली सय्यद -भोसले यांनी केलं. त्यांचे महाराष्ट्रभर कौतुक केले जात आहे.
कुस्ती’ मर्दानी कुस्ती हा कोल्हापूरातील लोकप्रिय खेळ आहे. काही राजे हे स्वत: एक चांगले पैलवान आहेत. जवळजवळ प्रत्येक आठवड्याला येथे जंगी कुस्त्यांचे नियोजन केले जाते. अशावेळी खुल्या मैदानात कुस्त्या खेळवल्या जातात. येथील राजे शाहु महाराज हे एक पैलवान होते आणि त्यांनी स्वत: खासबाग मैदानाची कुस्ती खेळासाठी बांधणी केली. जेव्हा ते युरोप सहलीला गेले होते त्यावेळी त्यांनी तेथे रोम येथील प्रसिध्द ‘कॅलोशिअम’ मैदान पाहिले आणि त्यावेळी त्यांनी अशा प्रकारचे मैदान कोल्हापूरात उभारायचे ठरवले आणि त्यांनी सहलीवरून परत आल्यानंतर ‘कॅलोशिओ’ सारखे खासबाग मैदान उभारले.खासबाग हे एकमेवच भारतातील कुस्तीचे मैदान आहे. मैदानाच्या मध्यभागी असलेल्या हौद्यातील कुस्ती कोणत्याही अडथळ्याशिवाय जवळजवळ 60,000 लोक पाहू शकतात. राजकीय लोकांकरीता एक वेगळा भाग ईशान्य बाजुला ऊभारला आहे.
याच ऐतिहासिक कोल्हापुरात ही कुस्ती स्पर्धा भरवून कोल्हापूरच्या उंचीमध्ये त्यांनी मानाचा तुरा खोवला आहे.
एक यशस्वी अभिनेत्री असतानाही समाजकारणावर त्यांनी विशेष भर दिला. प्रशासनाची साथ हवी म्हणून त्यांनी अनेक राजकीय लोकांचीही भेट घेतली. त्यांनी समाजकारण करण्यात अधिक भर टाकली. कोरोनाच्या काळात अनेक निराधारांना त्यांनी आधार दिला. कोरोनामुळे अनाथ झालेल्यांना त्यांनी विशेष आर्थिक सहकार्य केले. कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर मास्क,सॅनिटायझर वाटप केले.
सय्यद -भोसले यांनी क्रीडा क्षेत्रात सुद्धा विशेष लक्ष घातले आहे. खास करून महिला पैलवानांना भविष्यात त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांना साथ आहे; त्यामुळे नक्कीच त्या क्रीडा क्षेत्रात असणाऱ्यांच्या साठी चांगली कामगिरी करावी,महिला ऑलिंपिक स्तरावर खेळाव्यात त्या विजेता व्हाव्यात,यासह त्यांना आर्थिक स्थैर्य मिळावं म्हणून नोकरी अशा प्रकारचे सहकारी मिळावे हीच क्रीडाप्रेमीची त्यांच्याकडून अपेक्षा.