मुलाची शपथ घेऊन विश्वासघात करणाऱ्या दादा लाड यांना सभासद धडा शिकवतील : एच. आर. पाटील
भ्रष्टाचाराबाबत विचारलेल्या प्रश्नांची ते उत्तरे देत नाहीत : बाबा पाटील
आवाज इंडिया प्रतिनिधी कोल्हापूर
'कोल्हापूरचा शिक्षक आमदार होऊ दे, अशी स्टेजवर घोषणा करायची आणि माघारी आसगावकर यांना मते देऊ नका' असे म्हणणाऱ्या लाड यांना कोजीमाशीतून हाकला असे आवाहन आ. जयवंत आसगावकर यांनी केले.
ते शेंडूर (ता. कागल) येथील कागल तालुक्याच्या मेळाव्यात बोलत होते.
आ. आसगावकर म्हणाले, शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत लाड यांनी विश्वासघात केलेचे पुरावे आमच्याकडे आहेत. पराभव झालेला उमेदवार त्यांना भेटायला येतो असे अनेक पुरावे लाड यांच्या विरोधातले आहेत. आमदारकी पेक्षा संस्थेवर दिलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे द्यावीत. ते उत्तर देत नसल्याकारणाने सभासद ओळखून आहेत. भ्रष्टाचारी कारभाऱ्याला बाजूला करायचं
मुलाची शपथ घेऊन विश्वासघात करणाऱ्या दादा लाड यांना सभासद धडा शिकवतील
कोजीमाशीचे माजी चेअरमन एच. आर. पाटील म्हणाले मुलाची शपथ घेऊन विश्वासघात करणाऱ्या दादा लाड यांना सभासद धडा शिकवतील. मी चेअरमन असताना शाळा भेट मला नाकारली. माझा जनसंपर्क बघून माझी उमेदवारी नाकारली. माझा हा जनसंपर्क दादा लाड यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. मी जखमी वाघ आहे जखमी वाघ काय करतो याची जाणीव दादाला यांना आहे
कोजीमाशी इमारतीतील दोन गाळे रानमाळे यांच्या नावावर आहेत. त्यामुळे लाड यांच्याकडे का गेले असावेत याचा सभासदांनी विचार करावा.
माजी संचालक समीर घोरपडे म्हणाले, कर्जावरील व्याजदर कमी न करणारे लाड बँकेचे हितचिंतक कसे, अशांना सभासदांनी बाजूला करावे आणि ही बँक दादाची आणि कंपनीची नसून शिक्षक सभासदांची आहे हे दाखवून द्यावे.
बाबा पाटील म्हणाले, सभासदांनीच ठरवलंय यावेळी भ्रष्टाचार करणाऱ्या प्रवृत्तीला बाजूला करायचे. भ्रष्टाचाराबाबत विचारलेल्या प्रश्नांची ते उत्तरे देत नाहीत. ते भ्रष्टाचारी आहेतच यावर सभासदांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे सभासद विमान या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करणारच आहेत.
यावेळी बाजार समितीचे माजी संचालक विलास साठे, मिलिंद पांगरेकर, के. के. पाटील, उदय पाटील,खोचरे सर एस. एम. पाटील, विजय पवार, बाळासाहेब पाटील, बाबा पाटील, डी. एस. खामकर, वजीर मकानदार, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, उमेदवार पांडुरंग कांबळे उर्फ पी. आर, बाळासाहेब चींदगे, यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.