Awaj India
Register
Breaking : bolt
बँकांनी पतपुरवठा आराखड्याचे अर्ध वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करावे*जिल्हा परिषदेत गणेशोत्सव रद्द करू नका; सदस्यांची अध्यक्षांकडे मागणीश्री कौस्तुभ गावडे यांना विधानपरिषदेमध्ये पाठविण्याचा शिक्षकांनी केला ठाम निर्धारचाळीस वर्षे समाजकारणाची परंपरा पुढे नेणारे उपमहापौर अक्षय जरग गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार: पाच लाख दूध उत्पादकाच्या पाठीशी राहणार डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सवाची सुरुवात उपमहापौर अक्षय विक्रम जरग यांच्या वाढदिवसानिमित्त २४७ रक्तदात्यांनी केले रक्तदानडी. वाय. पाटील अभियांत्रिकी* *एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सशाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसादसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा गेल्या हंगामातील रु. १०० चा हप्ता जमा*

जाहिरात

 

*युवासेनेच्या माध्यमातून युवकांना न्याय मिळवून देण्याचे काम घडत राहो:-*

schedule05 Jan 24 person by visibility 194 categoryराजकीय

*युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री. ऋतुराज क्षीरसागर.*

*युवासेना स्वामी विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर शाखा उदघाटन समारंभ..*

स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथे युवासेना शाखा उदघाटन सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख सुजितभाऊ चव्हाण आणि युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री. ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते आणि माजी परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी युवासेनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम सुरु असुन यापुढे देखील या शाखेच्या माध्यमातून युवक-युवतींची ऍडमिशन, तसेच इतर समस्या सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे राहून काम केले जावे, अशी अपेक्षा शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी व्यक्त केली.
तसेच या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता कसलीही अडचण येणार नाही कारण युवासेनेचा मावळा शाखेच्या रूपाने इथं उभा असल्याचे शहर सरचिटणीस विपुल भंडारे यांनी सांगितले.

यावेळी युवासेना जिल्हासंपर्कप्रमुख प्रसाद चव्हाण, जिल्हाप्रमुख ॲड. चेतन शिंदे, कोल्हापूर महानगर संघटक अक्षय कुंभार,उत्तर विधानसभा मतदार संघ अध्यक्ष शैलेश साळोखे,शहरप्रमुख पियुष
चव्हाण,शहरप्रमुख ॲड.मंदार पाटील, शिवसेना उपशहरप्रमुख अभिषेक काशीद,युवतीसेना शहरप्रमुख सौ.नम्रता भोसले, शहर सरचिटणीस विपुल भंडारे, शहर सरचिटणीस अजिंक्य पाटील,शहर सरचिटणीस अभिजीत कदम,शहर सरचिटणीस कपिल पोवार,आय. टी.सेना शहरप्रमुख सौरभ कुलकर्णी,उपशहरप्रमुख साहिल मुल्लाणी,युवानेते समरजित मोहिते,शाखाप्रमुख विराज ओतारी,उपशाखाप्रमुख यश शेलार,गटप्रमुख आदर्श बनसोडे,राजवीर पोवार,आदित्य पोवार,प्रज्वल पाटील,यश लोहार, आदिंसह युवक-युवती उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes