Awaj India
Register
Breaking : bolt
तुझको मिरची लगी तो मै क्या करू आय ट्रिपल ई’ च्या माध्यमातून* *संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा*एस.व्ही.सी. को-ऑपरेटिव्ह बँकेकडून माझ्यावर अन्याय शिवसेना, जनसुराज्य पक्षाची भूमिका मांडणारे मुश्रीफ कोण 14 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेला श्रीलंका,थायलंड,जपान, नेपाळ आदी देश विदेशातील बौद्ध धर्मगुरूंशी संवाद गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इस्पूर्ली पोलिसांची मोठी कारवाई: आगमन व विसर्जन मार्गावर शांतता काळातील आवाजाचे 'नील पंचनामे' पूर्ण*महिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान: लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर* करवीर पंचायत समितीसमोर आंदोलनाचा इशारा:गोकुळमध्ये राष्ट्रवादीच ‘मोठा भाऊ’; जागावाटपाचा तिढा चर्चेतून सुटेल : हसन मुश्रीफकास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड;

जाहिरात

 

सलग २० वेळा सेट-नेट उत्तीर्ण होण्याचा दुर्मिळ विक्रम; डॉ. राहुल भगवान पालके यांचे भव्य यश

schedule08 Feb 26 person by visibility 479 categoryशैक्षणिक

कोल्हापूर:
श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राहुल भगवान पालके यांनी डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या नेट परीक्षेत आदिवासी व प्रादेशिक भाषा-साहित्य या विषयात १६० गुण (९२.१३ पर्सेंटाईल) मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी आतापर्यंत नेट/सेट परीक्षा तब्बल २० वेळा, एकूण ८ वेगवेगळ्या विषयांत उत्तीर्ण होण्याचा दुर्मिळ विक्रम नोंदवला आहे. त्यांच्या या बहुआयामी आणि सातत्यपूर्ण यशाबद्दल शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक वर्तुळातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. पालके हे जुलै २०१२ पासून श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून अध्यापन कार्य करत आहेत. त्यांनी एम.ए. (इंग्रजी, मराठी), बी.एड. ही पदवी घेतली असून सेट (इंग्रजी व मराठी) तसेच नेट (इंग्रजी, मराठी, हिंदी, अर्थशास्त्र, वुमन स्टडीज, आदिवासी व प्रादेशिक भाषा-साहित्य) अशा विविध विषयांत त्यांनी यश मिळवले आहे. तसेच त्यांनी पीएच. डी. पदवीही संपादन केली आहे. शैक्षणिक कारकीर्दीत बी.ए. प्रथम क्रमांक, एम.ए. मध्ये के. भोगेशिअन फौंडेशन पारितोषिक, बी.एड. मध्ये आदर्श विद्यार्थी सन्मान अशी अनेक गौरवचिन्हे त्यांच्या वाट्याला आली आहेत.
ते एक संवेदनशील कवी व साहित्यिकही आहेत. अंगणातून नभांगणात (२०२३) हा पहिला काव्यसंग्रह, त्यानंतर अबोली (२०२३), निशिगंध (२०२४), कर्माजली (२०२४) आणि कर्माक्षरे (२०२५) हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. १७ व्या अखिल भारतीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात सहभाग व कविता सादरीकरण, तसेच १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात सूत्रसंचालन असा त्यांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय आहे.
डॉ. पालके यांनी विविध महाविद्यालयांत सेट/नेट मार्गदर्शन, युवकांसमोरील आव्हाने, महापुरुषांचे जीवन, इंग्रजी भाषा व साहित्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य अशा विषयांवर प्रभावी व्याख्याने दिली आहेत. कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, बार्शी येथे विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. सामाजिक भान जपत ते अॅनिमल फ्रेंड्स वलय, बार्शी मध्येही सक्रिय आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेत ओन्ली समाजसेवेचा आदर्श शिक्षक पुरस्कार (२०२४), धर्मवीर प्रतिष्ठान बार्शीचा शैक्षणिक पुरस्कार, तसेच नाशिक येथील महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्राच्या विविध साहित्यिक स्पर्धांतील पारितोषिके त्यांना मिळाली आहेत.
अथक परिश्रम, बहुविषयक अध्ययन आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन यामुळे डॉ. राहुल भगवान पालके यांनी शैक्षणिक क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes