Awaj India
Register
Breaking : bolt
14 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेला श्रीलंका,थायलंड,जपान, नेपाळ आदी देश विदेशातील बौद्ध धर्मगुरूंशी संवाद गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इस्पूर्ली पोलिसांची मोठी कारवाई: आगमन व विसर्जन मार्गावर शांतता काळातील आवाजाचे 'नील पंचनामे' पूर्ण*महिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान: लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर* करवीर पंचायत समितीसमोर आंदोलनाचा इशारा:गोकुळमध्ये राष्ट्रवादीच ‘मोठा भाऊ’; जागावाटपाचा तिढा चर्चेतून सुटेल : हसन मुश्रीफकास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड;राजारामपुरीत अवतरणार श्री कालभैरव सर्वसामान्य असूनही समाजसेवेचा ‘अनिल पवार पाचगावकर’ पॅटर्न!स्मार्ट मीटर बसविण्याच्या कारवाईस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचा तीव्र विरोधअंतरंग हॉस्पिटलचा तत्पर प्रतिसाद: अपोलो हॉस्पिटलची आणखी एक यशोगाथा

जाहिरात

 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इस्पूर्ली पोलिसांची मोठी कारवाई: आगमन व विसर्जन मार्गावर शांतता काळातील आवाजाचे 'नील पंचनामे' पूर्ण*

schedule13 Sep 26 person by visibility 28 categoryराजकीय

*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इस्पूर्ली पोलिसांची मोठी कारवाई: आगमन व विसर्जन मार्गावर शांतता काळातील आवाजाचे 'नील पंचनामे' पूर्ण*
 
चुये-आवाज इंडीया प्रतिनिधी:-
आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर इस्पूर्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. उत्सवादरम्यान मिरवणुकांमध्ये आवाजाची मर्यादा ओलांडली जाण्याची शक्यता लक्षात घेता, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सूचनेनुसार आगमन आणि विसर्जन मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी दोन सरकारी पंचांसमक्ष शांतता काळातील आवाजाचे सॅम्पल नमुने घेऊन 'नील पंचनामे' करण्यात आले आहेत.
गणेशोत्सवातील आगमन व विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टिमचा (डॉल्बी) अतिवापर होऊन ध्वनीप्रदूषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर इस्पूर्ली पोलीस ठाणे आणि कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने सर्व गणेश मंडळांना कडक इशारा व आवाहन करण्यात आले आहे. मंडळांनी व डॉल्बी चालकांनी कायद्यानुसार ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेतच साऊंड सिस्टिमचा वापर करावा आणि आगामी गणेशोत्सव शांततेत, उत्साहात व 'प्रदूषण मुक्त' साजरा करावा. आवाजाची मर्यादा ओलांडल्यास संबंधित गणेश मंडळ, तसेच डॉल्बीचे चालक व मालक यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
 
*पोलीस पथकाची कारवाई:*
कोल्हापूर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक मा. निलोत्पल साहेब यांच्या आदेशान्वये आणि इस्पूर्ली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गुरव, सहाय्यक फौजदार मेटील, सहाय्यक फौजदार पोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल अनिल पाटील यांच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन हे आवाजाचे सॅम्पल नमुने गोळा केले व पंचनामे पूर्ण केले.
उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी इस्पूर्ली पोलीस पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले असून नागरिकांनी व मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes