अंतरंग हॉस्पिटलचा तत्पर प्रतिसाद: अपोलो हॉस्पिटलची आणखी एक यशोगाथा
schedule09 Sep 26 person by visibility 15 categoryसामाजिक
अंतरंग हॉस्पिटलचा तत्पर प्रतिसाद आणि अपोलो हॉस्पिटलमधील अत्याधुनिक सेवा आणि उपचार यामुळे यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच सणाचे यकृत झाले पूर्ववत बरे, अपोलो हॉस्पिटलची आणखी एक यशोगाथा
पद्मजा नांद्रे या महिला आपल्या कुटुंबीयांसह कोल्हापूरहून नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणासाठी दाखल झाल्या होत्या. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती. प्रत्यारोपणाची आवश्यकता भासल्यास त्यांच्या मुलीची, संभाव्य जिवंत यकृतदाता म्हणून तपासणी करण्यात आली होती. मात्र, शस्त्रक्रियेची वेळ जवळ आलेली असताना, त्यांच्या वैद्यकीय अहवालांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांमुळे डॉक्टरांनी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय स्थगित केला. त्यानंतर रूग्णाच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा होत गेली. यकृत प्रत्योरोपण शस्त्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली होती. मात्र अपोलो हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांचे बारकाईने लक्ष, तत्पर आणि अत्याधुनिक उपचार यामुळे रूग्णावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याची वेळच आली नाही.
पद्मजा यांना सुरुवातीला तीव्र यकृत निकामी होण्याच्या समस्येमुळे कोल्हापूरातील अंतरंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांच्या बिलिरुबिनची पातळी झपाट्याने वाढली. उपचारांनंतरही अपेक्षित सुधारणा होत नसल्याने, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी पद्मजा यांना विशेष यकृत उपचार आणि प्रत्यारोपण करणे आवश्यक असल्याचे ओळखले आणि तातडीने पद्मजा यांना नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलकडे संदर्भित केले. अंतरंग हॉस्पिटलमधील डॉ. आदित्य कुलकर्णी, यांनी पद्मजा यांची त्यावेळची परिस्थिती स्पष्ट केली. पद्मजा अंतरंग हॉस्पिटलमध्ये आल्या, तेव्हा त्यांच्या यकृताच्या कार्यक्षमतेत झपाट्याने होणारी घसरण ही चिंतेची बाब होती, त्यांना स्थानिक पातळीवरील उपचारपिक्षा अधिक विशेष उपचारांची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. रुग्णाची गंभीर स्थिती आणि तातडीने प्रत्यारोपणाच्या स्तरावरील उपचार होण्यासाठी पद्मजा यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण प्रत्यारोपणाची गरज भासल्यास, अपोलो हॉस्पिटलमध्ये रुग्णाला अत्याधुनिक अतिदक्षता उपचार मिळतील आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. त्यानुसार नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये पद्मजा यांना दाखल करण्यात आले. यकृत प्रत्यारोपण आणि अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली, प्रत्यारोपणासंदर्भात कुटुंबियांचे समुपदेशन करण्यात आले, तर पद्मजा यांच्या मुलीची संभाव्य यकृतदाता म्हणून आली.
अपोलो हॉस्पिटलमधील लीड कन्सल्टंट आणि ट्रान्सप्लांटेशन सर्जरी हेड डॉ. गुरुप्रसाद शेट्टी रूग्णावर अत्यंत बारकाईन लक्ष ठेवून होते. तसेच वैद्यकीय स्थितीचे सातत्याने मूल्यांकन सुरू होते. प्रत्यारोपणाची सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतरही, नियोजित शस्त्रक्रियेच्या अगदी आधीपर्यंत, पद्मजा यांच्या ताज्या वैद्यकीय अहवालांचा आढावा घेतला जात होता. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची चिन्हे दिसताच, तातडीने शस्त्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या गंभीर कालावधीत अपोलो हॉस्पिटलमधून विशेष यकृत उपचार आणि अतिदक्षता सेवा देण्यात आली. त्यामध्ये प्लाझ्मा एक्सचेंजच्या अनेक सत्रांचाही समावेश होता. अपोलो हॉस्पिटलमधील क्रिटिकल केअरचे तज्ञ डॉ. सुवदीप सेन यांनीही या केसबद्दल माहिती दिली. पद्यज हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. तेव्हा त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या यकृताची कार्यक्षमता पूर्ववत होण्याची शक्यता आहे का, हे तपासण्यासाठी प्लाझ्मा एक्सचेंजची अनेक सत्रे केली. त्यांच्या शारीरिक स्थितीत स्थैर्य राखणे, वैद्यकीय आणि प्रयोगशाळेतील तपासण्यांचे बारकाईने निरीक्षण करणे आणि यकृताची कार्यक्षमता कमी होताना निर्माण होणारी गुंतागुंत टाळणे, यावर हॉस्पिटलचा मुख्य भर होता. पण पद्मजा यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेल्याने, अखेर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया रद्द करण्यात आली. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलचे हेपेटोलॉजी तज्ञ डॉ. अमेय सोनवणे म्हणाले, यकृत निकामी होण्याची स्थिती वेगाने बदलू शकते आणि काही तासांच्या कालावधीत रुग्णाची वैद्यकीय स्थिती बदलू शकते. पद्मजा यांना अंतरंग हॉस्पिटलमधून वेळेवर अपोलो हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. जिथे अत्याधुनिक अतिदक्षता उपचार आणि यकृत प्रत्यारोपण या दोन्ही सुविधा उपलब्ध होत्या. अपोलोमाटो साततापूर्ण उपचार आणि निरीक्षणातून त्यांच्या प्रकृतीट होणारी सुधारणा ओळखता आली आणि गकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करता, पद्मजा यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि त्या कोल्हापूरला सुखरुप परतल्या. ही केस झपाट्याने यकृत निकामी होण्याच्या स्थितीत प्रत्यारोपणाची सुविधा असलेल्या केंद्रात वेळेवर रेफर करण्याचे महत्त्व अधोरेखित करते. लवकर रेफर केल्यामुळे अत्याधुनिक अतिदक्षता उपचार होतात आणि गरज भासल्यास पुन्हा प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध राहते. तसेच, रुग्णाचे यकृत पुन्हा कार्यक्षम होऊ शकते का, याचे तज्ज्ञ डॉक्टरांना सातत्याने पुनर्मूल्यांकन करता येते.
अपोलो हॉस्पिटल्सविषयी -
डॉ. प्रताप रेड्डी यांनी १९८३ मध्ये चेन्नई येथे पहिले हॉस्पिटल सुरू केल्यानंतर, अपोलोने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात मोठी क्रांती मटवून आणली. आज अपोलो हॉस्पिटल हे जगातील सर्वात मोठ्या एकात्मिक आरोग्यसेवा नेटवर्कपैकी एक असून, ७६ हॉस्पिटल्समध्ये १० हजार ४०० हून अधिक बेड्स, ७ हजार ११३ हून अधिक फार्मसी, ३०८ क्लिनिक्स, २ हजार ४५७ डायग्नोस्टिक सेंटर आणि ८०० हून अधिक टेलिमेडिसिन सेंटर आहेत. अपोलो हे जगातील आघाडीच्या हृदयविकार उपचार केंद्रांपैकी एक असून, आतापर्यंत ३ लाखांहून अधिक अँजिओप्लास्टी आणि २ लाखांहून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. रुग्णांना जगातील सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, उपकरणे आणि उपचार पद्धती आणण्यासाठी अपोलो सातत्याने संशोधन आणि गुंतवणूक करते. सुमारे १ लाख २० हजार कुटुंबीयांना उत्कृष्ट आरोग्यसेवा देणे आणि जगाला अधिक चांगले बनवणे हा अपोलोचा उद्देश आहे.