Awaj India
Register
Breaking : bolt
अंतरंग हॉस्पिटलचा तत्पर प्रतिसाद: अपोलो हॉस्पिटलची आणखी एक यशोगाथाभारतीय बौध्द महासभेच्या वतीने डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ सप्टेंबरला जाहीर स*आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या शिवीगाळीप्रकरणी आरती आंबी पुणे कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार...* *डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला* *‘रोटरी’ कडून अत्याधुनिक नेफ्रोकेअर उपकरणे**बालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड* *आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन*जिल्ह्यातील ३१ आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ९० सराईत गुन्हेगारांना कडक सूचनासंविधान साक्षर शाळेच्या उपक्रमातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यासआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रा. तुळशीदास हरी कांबळे यांची निवडडॉ. दत्तात्रय केरबा कांबळे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर

जाहिरात

 

भारतीय बौध्द महासभेच्या वतीने डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ सप्टेंबरला जाहीर स

schedule09 Sep 26 person by visibility 13 categoryसामाजिक

 
कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे बौद्धांची व्यवस्था निर्मिती या विषयावर शनिवार दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता शाह स्मारक सभागृह, दसरा चौक, कोल्हापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व दि. बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
भारतीय बौद्ध महासभा, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तसेच एएमएससी आणि बीसीएम (Buddhist Co-operative Movement)) यांच्या संयुक्त विद्यमाने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्ध समाजाने सामाजिक, आर्थिक व सहकार क्षेत्रात सक्षम व्यवस्था उभी करण्याच्या दृष्टीने या सभेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
 
या सभेत आरक्षण संकुचित होत असताना पुढे काय? तसेच सहकारातून सर्वांगीण विकास कसा साधता येतो? या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कम्युनल अवॉर्डच्या धर्तीवर उभारल्या जाणाऱ्या बौद्धांच्या सर्वंकष स्वतंत्र व्यवस्थेचा आराखडा तसेच जगभरातील शोषित समुदायांनी सहकाराच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आपले स्थान कसे निर्माण केले, याबाबतही विचारमंथन होणार आहे.
 
या कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. राजरत्न अशोक आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हे आहेत.
 
सभेस प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष आयु. शशिकांत जाधव, राष्ट्रीय संघटक आयु. महेश धम्मरक्षित, राष्ट्रीय समन्वयक आयु. रविकांत जाधव, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आयु. बुधाजी वाढविंदे, महाराष्ट्र राज्य महासचिव आयु. हेमंत जाधव, महाराष्ट्र राज्य कार्यक्रम समन्वयक आयु. नरेंद्र चव्हाण आणि महाराष्ट्र राज्य सदस्य आयु. दिलीप कांबळे उपस्थित राहणार आहेत.
 
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आयु. साताप्पा कांबळे, उपाध्यक्ष आयु. प्रा. ज्योती भडके, आयु. आप्पासो कांबळे, आयु, चंद्रकांत सूर्यवंशी, महासचिव आयु. प्रा. अशोक कांबळे, सचिव आयु. रमेश कांबळे व कोषाध्यक्ष आयु. श्यामराव कांबळे यांच्यासह पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
 
सभेसाठी संस्कार प्रमुख आयु. नागेश कांबळे, मुख्य संघटक आयु. अनिल कांबळे, महिला संघटक आयु. भारती कांबळे, विहार समन्वयक आयु. आर. आर. प्रधान आणि सुरक्षा रक्षक आयु. संदीप कांबळे यांनी विशेष निमंत्रण दिले आहे.
 
या कार्यक्रमास भीमसैनिक तसेच व्यावसायिक, उद्योजक, नोकरदार, बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ, युवक-युवती तसेच नव्या स्टार्टअप क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
 
पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष साताप्पा कांबळे, राष्ट्रीय संघटक महेश धम्मरक्षित, राज्य सदस्य दिलीप कांबळे, महासचिव अशोक कांबळे, विहार समन्वय आर. आर. प्रधान, महिला संघटक भारती कांबळे आदि उपस्थित होते.
 
टी

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes