*आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या शिवीगाळीप्रकरणी आरती आंबी पुणे कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार...*
schedule09 Sep 26 person by visibility 8 category
कोल्हापूर :आवाज इंडिया
आमदार संजय गायकवाड यांनी 9 मिनिटात दिलेल्या शिव्या, शिवरायांचा केलेला अपमान, जिवे मारण्याची धमकी व बलात्काराच्या धमकी प्रकरणाला 141 दिवस झाले. एकीकडे एक-दोन शिव्या ऐकून एखाद्या महिलेची विनयभंगाची तक्रार घेऊन एका तासात संतोष पंडित सारख्या सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर एका तासात FIR दाखल होऊन अटक होते आणि दुसरीकडे एवढे दिवस होऊन साधी FIR आमदार संजय गायकवाड यांच्यावर होत नाही, हे अत्यंत संतापजनक आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत आरती रेडेकर भूमिका मांडताना म्हणाल्या, आमदार संजय गायकवाड यांचा फोन प्रशांत आंबींना ज्यावेळी आला होता, त्यावेळी मी स्वतः शेजारीच उभी असल्यामुळे मी यातील बऱ्याच शिव्या स्वतः ऐकल्या आहेत, पण कोल्हापूर पोलिसांनी पहिल्या दिवसापासून माझी विनयभंगाची तक्रार घेतली नाही. कोल्हापूर पोलिसांनी मला न्याय दिला नाही, पण कोथरूड पोलीस स्टेशन मला नक्की न्याय देईल, त्यामुळेच Zero FIR दाखल करण्यासाठी मी शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता आमदार रोहित पवार व चळवळीतील इतर कार्यकर्त्यांसोबत स्वतः जाणार आहे.
या प्रकरणात कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही व्हावी, तसेच महिलांच्या सन्मानाबाबत समाजात स्पष्ट संदेश जावा, यासाठी विविध सामाजिक व पुरोगामी संघटनांचा सहभाग राहणार असल्याचेही गिरीश फोंडे यांनी स्पष्ट केले.
आमदार संजय गायकवाड यांनी मला दिलेल्या शिव्या ऐकून पण महाराष्ट्रातल्या अनेक आया-बहिणींना लाज वाटली, त्यांनासुद्धा स्त्रीमन असल्यामुळे महाराष्ट्राातील माय-माऊलींना, बहिणींना माझी विनंती आहे की, ज्यांनी ज्यांनी मला आमदार संजय गायकवाड यांनी शिव्या देतानाचा ऑडिओ ऐकला असेल, त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर महाराष्ट्रभर विनयभंगाची तक्रार दाखल करावी, असे आवाहन प्रशांत आंबी यांनी केले.
या पत्रकार परिषदेत हरीश कांबळे, सुनील कोळी, श्रीकांत कोळी हे देखील उपस्थित होते.