Awaj India
Register
Breaking : bolt
अंगणवाडी सेविकेच्या कार्याची उल्लेखनीय कामगिरी; ज्योती कांबळे यांचा गौरवपल्लवी गोसावी यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवडतंत्रस्नेही शिक्षक म्हणून शहाजी गायकवाड यांची उल्लेखनीय कामगिरीडॉ. हरीश भालेराव यांची ‘नॅशनल आयडियल टीचर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड-२०२६’साठी निवडडी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा* *देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकार*नवीन शैक्षणिक धोरणातील कार्यभार व CHB प्राध्यापकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्याबालकांसाठीचा पोक्सो कायदा कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यतेतील अन्यायकारक निकष बदलण्याची मागणीसामाजिक क्षेत्राला नियमनाची दिशा; ‘महा सीएसआर प्राधिकरणा’कडे महाराष्ट्राची वाटचाल**डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या* *विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स*

जाहिरात

 

अंगणवाडी सेविकेच्या कार्याची उल्लेखनीय कामगिरी; ज्योती कांबळे यांचा गौरव

schedule02 Sep 26 person by visibility 8 categoryशैक्षणिक

अब्दुललाट : बालकांच्या सर्वांगीण विकासासोबतच ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांसाठी विविध उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ज्योती महेश कांबळे यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.
अब्दुललाट, ता. शिरोळ येथील बरगाले वसाहत अंगणवाडी क्रमांक १७५ येथे ज्योती कांबळे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांची या पदावर १० ऑगस्ट १९९८ रोजी नियुक्ती झाली. गेल्या अनेक वर्षांपासून त्या अंगणवाडीतील बालक, महिला आणि पालकांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहेत.
अंगणवाडीमध्ये नियमित शैक्षणिक व बालविकासाच्या उपक्रमांसोबतच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी विशेष कार्य करण्यावर त्यांनी भर दिला आहे. स्थलांतरित व ऊसतोड कामगारांच्या कुटुंबातील बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्य व विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘सुंदर माझी अंगणवाडी’ उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. तसेच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून बालकांमध्ये सामाजिक जाणीव, समता, बंधुता आणि महापुरुषांच्या विचारांची ओळख निर्माण करण्याचे कामही त्या करीत आहेत.
एम.ए. शिक्षण असलेल्या ज्योती कांबळे यांनी अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून बालशिक्षणाबरोबरच सामाजिक प्रबोधनाची जबाबदारीही प्रभावीपणे सांभाळली आहे. त्यांच्या दीर्घकाळाच्या सेवाभावी आणि उल्लेखनीय कार्यामुळे अब्दुललाट परिसरात त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes