Awaj India
Register
Breaking : bolt
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड;राजारामपुरीत अवतरणार श्री कालभैरव सर्वसामान्य असूनही समाजसेवेचा ‘अनिल पवार पाचगावकर’ पॅटर्न!स्मार्ट मीटर बसविण्याच्या कारवाईस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचा तीव्र विरोधअंतरंग हॉस्पिटलचा तत्पर प्रतिसाद: अपोलो हॉस्पिटलची आणखी एक यशोगाथाभारतीय बौध्द महासभेच्या वतीने डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ सप्टेंबरला जाहीर स*आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या शिवीगाळीप्रकरणी आरती आंबी पुणे कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार...* *डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला* *‘रोटरी’ कडून अत्याधुनिक नेफ्रोकेअर उपकरणे**बालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड* *आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन*जिल्ह्यातील ३१ आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर*

जाहिरात

 

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड;

schedule11 Sep 26 person by visibility 7 categoryराजकीय

; सुरेश सोनगेकर कार्याध्यक्ष तर संतोष गायकवाड सचिवपदी  
​कोल्हापूर:
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ (महाराष्ट्र राज्य) जिल्हा शाखा कोल्हापूरची नवीन जिल्हा कार्यकारिणी नुकतीच बिनविरोध जाहीर करण्यात आली. सिंचन भवन रेस्ट हाऊस सभागृह, ताराबाई पार्क येथे महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. विनायक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्य संघटक सचिव श्री. सनी माने यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली.  
​जिल्हा संघटनेचे काम अधिक प्रभावीपणे राबवणे, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संघटित लढा उभारणे आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करणे हा या निवडीचा मुख्य उद्देश आहे. सर्व संलग्न संघटनांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करून नूतन कार्यकारिणी एकमताने मंजूर करण्यात आली.  
​नूतन जिल्हा कार्यकारिणी खालीलप्रमाणे:
​कार्याध्यक्ष: श्री. सुरेश सोनगेकर  
​कार्याध्यक्षा: श्रीमती अंजना माने  
​उपाध्यक्ष: श्री. अलंकार पेडणेकर  
​सचिव: श्री. संतोष गायकवाड  
​सहसचिव: श्री. जावेद सय्यद  
​कोषाध्यक्ष: श्री. अनिल माने  
​प्रसिद्धीप्रमुख: श्री. नंदकुमार वर्धन  
​कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करणार
या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यातील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करणे, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व विभाग प्रमुखांकडे निवेदने सादर करणे, सभासद नोंदणी वाढवणे आणि महासंघाच्या वरिष्ठ स्तरावरील निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे ठरवण्यात आले.  
​बैठकीस दिव्यांग संघटना, शिक्षक संघटना, शासकीय-निमशासकीय वाहनचालक संघटना आणि जलसंपदा कर्मचारी संघटनेचे विविध प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष विनायक कांबळे यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून संघटनेचे कार्य एकजुटीने पुढे नेण्याचे आवाहन केले.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes