Awaj India
Register
Breaking : bolt
थोरला दवाखाना गोरगरिबांची आरोग्यदायीनी तर केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर शहराची अस्मिता*विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून कोल्हापुरात एनडीए परीक्षेचे केंद्र सुरू करावे* डॉ. डी. वाय. पाटील यांनी गुणवत्तेची संस्कृती निर्माण केली*डॉ.झांबरे, प्रा.सौ.पाटील व डॉ.वाटेगांवकर यांच्या संशोधनास भारत सरकारचे पेटंट*पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार*पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दादा यांच्या अखेरच्या दर्शनासाठी लोकांची मोठी गर्दीशिक्षण क्षेत्रात संस्था उभारणीचं मोठं काम करणाऱ्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली : राज ठाकरे कुलगुरू यांनी घेतले शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनमाजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचा* *‘बेस्ट इन्स्टिट्यूट’ पुरस्काराने सन्मान*

जाहिरात

 

पुण्यसृष्टी प्रकल्प : अतिक्रमण काढण्याचे आदेश

schedule24 Jun 26 person by visibility 358 categoryगुन्हे

कोल्हापूर, दि. २४ : सम्राट नगर व प्रतिभानगर परिसरातील नागरिकांच्या तक्रारीनंतर कोल्हापूर महानगरपालिकेने पुण्यसृष्टी सहकारी गृहनिर्माण संस्था व संबंधित विकासक रामसिना कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि. यांना नोटीस बजावली आहे. 
 
महापौर जनता दरबारात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पुण्यसृष्टी प्रकल्पाच्या पश्चिमेकडील १२ मीटर रुंद रस्त्यावर फुटपाथ व गटाराचे बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आल्याची बाब समोर आली होती. तसेच मालती अपार्टमेंट परिसरातील मनपाच्या जुन्या फुटपाथ व गटाराची रचना बदलून चुकीच्या मोजमापाने नवीन बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, शिंदे अपार्टमेंटजवळील महापालिकेच्या मालकीच्या ओढ्याभोवती पत्र्याचे कुंपण करून तो विकासकाच्या हद्दीत घेतल्याचीही तक्रार नागरिकांनी केली होती.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता १२ मीटर रुंद रस्त्यावर फुटपाथ व गटाराचे बांधकाम करून अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेने संबंधितांना नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत स्वतःहून अतिक्रमण हटवून खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार महापालिकेकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes