Awaj India
Register
Breaking : bolt
गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार: पाच लाख दूध उत्पादकाच्या पाठीशी राहणार डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सवाची सुरुवात उपमहापौर अक्षय विक्रम जरग यांच्या वाढदिवसानिमित्त २४७ रक्तदात्यांनी केले रक्तदानडी. वाय. पाटील अभियांत्रिकी* *एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सशाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसादसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा गेल्या हंगामातील रु. १०० चा हप्ता जमा*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळे गावातील प्रमुख मार्गावरील खड्डे बुजवास्वप्नपूर्ती जिल्हा सहकारी गृहतारण संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहातकरवीर तालुक्यातील गुंठेवारी प्रकरणांची विशेष चौकशी करानामदार बावनकुळे साहेब यांचा जनता दरबार भेंडी बाजार

जाहिरात

 

उपमहापौर अक्षय विक्रम जरग यांच्या वाढदिवसानिमित्त २४७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

schedule24 Aug 26 person by visibility 68 categoryराजकीय

आवक उपमहापौर अक्षय विक्रम जरग यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद
 
कोल्हापूर, ता. २४ : कोल्हापूर महानगरपालिकेचे उपमहापौर अक्षय विक्रम जरग यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम न करता सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान, आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
 
रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी शिवाजी पेठ येथील खंडोबा देवालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत तब्बल २४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदानातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
 
त्यानंतर सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांच्या विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. यामध्ये शुगर, कोलेस्ट्रॉल, हिमोग्लोबीन आदी तपासण्यांचा समावेश होता. तसेच नेत्र तपासणी शिबिरालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉक्टरांनी नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करून डोळ्यांची योग्य निगा राखण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन केले.
 
दरम्यान, बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी उपमहापौर अक्षय जरग यांचा वाढदिवस साजरा होत आहे. या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी पुष्पगुच्छ, हार अथवा इतर सत्कार साहित्य न आणता शालेय साहित्य आणून गरजू विद्यार्थ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमांमुळे समाजोपयोगी कार्याला प्रोत्साहन मिळत असून, वाढदिवसाचा आनंद सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यांत येत आहे.
 
कळावे,

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes