सायकल रिक्षा ओढणाऱ्या बापाच्या लेकाने कोरले सुवर्ण पदकावर नाव
schedule01 Aug 22 person by visibility 1410 categoryक्रीडा
असित बनगे आवाज इंडिया प्रतिनिधी
बर्मिंगहॅम 1 ऑगस्ट 2022
मीराबाई चानू,जेरेमी लालनिरुंगा ( सुवर्णपदक ) ,संकेत सरगर, बिंद्याराणी देवी ( रौप्य ) , व गुरुराजा पुजारी ( कास्य) यांच्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टींगमध्ये भारताने सहावे पदक जिंकले आहे .पश्चिम बंगालच्या देऊलपुर गावात मध्यम वर्गीय कुटुंबातील अंचिता शेऊली याने आज भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रमाचीही नोंद केली.
कोण आहे अंचिता शेऊली?
पश्चिम बंगालच्या देऊलपुर गावात मध्यम वर्गीय कुटुंबात अंचिता शेऊलीचा जन्म झाला.2021 मध्ये ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टींग अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक आणि राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदके त्याच्या नावावर आहेत.
भावाने वेटलिफ्टींग सोडून स्वीकारली कुटुंबाची जबाबदारी -
अंचिताचे वडील सायकल रिक्षा चालवून कुटुंब सांभाळायचे.पण अंचिता इयत्ता 8 वी मध्ये असताना वडिलांचे निधन झाले.त्यानंतर त्यांच्या छोट्याशा कुकुट पालन फार्मवर कोल्ह्यांनी हल्ला केला.आर्थिक परिस्थिती कोलमडून पडल्याने अंचिताचा मोठा भाऊ जो वेटलिफ्टर होता त्याने embroidery शिकून कुटुंबाची जबाबदारी स्विकारली.
कॉमनवेल्थ गेम मध्ये अंचिताने 73 किलो वजनी गटात वेटलिफ्टींगमध्ये स्नॅच प्रकारात सर्वोत्तम कामगिरीशी बरोबरी करताना 143 किलो वजन उचलले.त्याने राष्ट्रकुल स्पर्धा विक्रमही मोडला. स्नॅच प्रकारात अंचिताने 137, 140, व 143 असे भार उचलले.