+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव. adjust*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा* *डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ adjustजनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा मंत्री हसन मुश्रीफ adjustशाहूप्रेमींच्या साक्षीने अभिवादन adjustछत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा काढला हा अपमान नाही काय? : राजेश क्षीरसागर adjustशाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरचे समतावादी विचार सिद्ध करा adjustशेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी शाहू महाराजच खासदार आवश्यक : आ. पी. एन. पाटील adjustसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ? : संभाजीराजे छत्रपती
schedule29 Apr 24 person by visibility 77 categoryराजकीय

खासदार संजय मंडलिक यांची सतेज पाटील यांना कोपरखळी
       
गारगोटी ता. २८ : निवडून आलेल्या खासदारालाच लोकसभेमध्ये बोलावे लागते. प्रवक्त्याचे वटमुखत्यारपत्र जाहीर सभेत चालते, संसदेत चालत नाही. अशी कोपरखळी महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता 
मारली.
भुदरगड तालुक्यातील वाघापूर, गंगापूरसह अनेक गावातील वाड्या-वस्त्यांमध्ये प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. त्यांच्या समवेत राहुल देसाई, प्रा. अर्जुन अबिटकर, पंडितराव केणे, कल्याणराव निकम, नाथाजी पाटील, राजेखान जमादार, दत्ता उगले, नंदकुमार ढेंगे, संग्राम सावंत, प्रकाश कांबळे यांच्यासह भुदरगड तालुक्यातील अनेक प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते.
संजय मंडलिक म्हणाले,"संसदेत आजअखेर झालेल्या १०६ घटनादुरुस्त्यांमध्ये काँग्रेसने ७३ तर मोदी सरकारने केवळ ६ घटनादुरुस्त्या केल्या आहेत. त्यामुळे संविधानाला खरा धोका काँग्रेस पासूनच आहे. जगावर कोसळलेल्या कोरोनाच्या संकटाला संधी समजून जगातील ५३ गरीब देशांना मोदींनी लस पुरवली. त्यामुळे जगभर भारतीयांचे रेड कार्पेटने स्वागत होते. आता देशाचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असून देशाला स्थैर्य आणून देण्यासाठी व देश बलवान करण्यासाठी या लोकसभा निवडणुकीला महत्त्व आहे. गेल्या ७५ वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर कालावधीत देशाची विकसनशील वाटचाल काही बदलली नव्हती. रोटी, कपडा और मकानच्या पुढे विषय काही सरकला नव्हता. नरेंद्र मोदी यांनी मात्र गेल्या दहा वर्षात ८० कोटी लोकांना मोफत धान्य योजना राबवली. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या तब्बल १६०० च्या वर क्रांतिकारक निर्णयांनी देशाला आर्थिक, सामाजिक स्थैर्य आणून दिले आहे." 
गंगापूरमध्ये पंडितराव केणे, कल्याणराव निकम, प्रकाशराव कुलकर्णी, प्रा. अर्जुन आबिटकर, नाथाजी पाटील, तानाजीराव पाटील, राहुल देसाई, सरपंच सीमा जाधव, प्रकाश कांबळे, सुरेश ढेकळे, अजित जाधव, सुरेश किल्लेदार, पुंडलिक खापे, भैरू गुरव, राजेखान जमादार, नाथाजी पाटील, संग्राम सावंत, नंदकुमार ढेंगे, दत्ताजीराव उगले, सचिन पिसे, अजित पाटील, अक्षय देसाई, रोहित मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तानाजी जाधव यांनी स्वागत केले. प्रकाश कुलकर्णी, पंडित केणे व राहुल देसाई यांचीही भाषणे झाली.
पळशीवणे येथे मारुती कदम यांनी स्वागत केले. यावेळी सरपंच अशोक कदम, दिलीप पाटील, संग्राम सावंत, संतोष पोवार, आनंदा हुजरे, अशोक कुराडे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. निलेश रेडेकर यांनी आभार मानले. 
पाली येथे पाली, नांगरगाव व भेंडवडेतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सरपंच सुशीला गुरव, प्रा. बाळासाहेब पाटील, गणेश पाटील, अरुण पाटील, भैरी जाधव नामदेव पाटील यांच्यासह प्रमुख उपस्थित होते.
पुष्पनगर येथे सरपंच वैशाली शिंदे, जयवंत चोरगे निलेश देसाई, सौ. देसाई, उपसरपंच पांडुरंग कोकरे, सुरेश देसाई, एम. डी. देसाई, राजेंद्र देसाई, आदी उपस्थित होते. जयवंत चोरगे यांनी स्वागत केले. 
मडुर येथे मुस्तकीन काजी यांनी स्वागत केले. सरपंच जयसिंग सुतार, मधुरा देवडकर, विष्णू मोरे यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोनारवाडी येथे प्रा. दौलतराव जाधव यांनी स्वागत केले. राहुल देसाई, नाथाजी पाटील, संग्राम सावंत, भैय्या सावंत, आदी उपस्थित होते.


संजय मंडलिक निष्ठावंतच ...

 संजय मंडलिकांनी पक्ष बदलल्याचा कांगावा करणाऱ्यांचा समाचार घेताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, खासदार संजय मंडलिक हे निष्ठावंतच आहेत. त्यांनी २०१४ , २०१९ या दोन्ही लोकसभा धनुष्यबाण चिन्हावर लढवल्या. आता २०२४ मध्ये तिसऱ्यांदाही ते धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणूक लढवत आहेत. तीनही वेळा पक्ष तोच, चिन्ह तेच.त्यामुळे विरोधकांच्या कांगाव्यात दम नाही ?