+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव. adjust*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा* *डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ adjustजनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा मंत्री हसन मुश्रीफ adjustशाहूप्रेमींच्या साक्षीने अभिवादन adjustछत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा काढला हा अपमान नाही काय? : राजेश क्षीरसागर adjustशाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरचे समतावादी विचार सिद्ध करा adjustशेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी शाहू महाराजच खासदार आवश्यक : आ. पी. एन. पाटील adjustसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ? : संभाजीराजे छत्रपती
schedule08 Aug 23 person by visibility 137 categoryउद्योग

कोल्हापूर (आवाज इंडिया)
   गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम हा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले. राजेंद्र नगर येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जमलेल्या वह्यांचे तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र साबळे यांच्याकडून दिलेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप प्राचार्य नरके आणि मान्यवरांच्या हस्ते झाले. 

यावेळी बोलताना डॉ. नरके यांनी आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २००७ पासून सुमारे ५४ लाख वह्यांचे बारा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना वाटप झाले असून या माध्यमातून या गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस मोठा हातभार लागल्याचे नमूद केले. 
गरजू आणि गरीब मुलांना शिक्षण देणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत आणि त्यांचा शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र साबळे, माजी नगरसेवक लाला भोसले, संदीप बिरांजे, विश्वविक्रम कांबळे, उदय कांबळे, बळी नामदास, दयानंद खवले, नागेश शिंदे,संगीता चकरे, मिना कांबळे ,मुख्याध्यापक उमेश गुरव,चारुशीला बिडवे,हनीफ नाकडे , नामदेव उंडे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते