*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन*
schedule26 Apr 24 person by visibility 165 categoryशैक्षणिक
कोल्हापूर ;
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी बनविलेली विविध आर्किटेक्चरल डिझाईन्स व अन्य उपक्रमांचे प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवन , दसरा चौक येथे आयोजन करण्यात आले आहे. दि. २९ व ३० एप्रिल रोजी होणाऱ्या या प्रदर्शनात बिल्डिंग कंस्ट्रक्शन, ग्राफिक्स , इंटिरियर डिझाईन, अर्बन डिझाईन, तसेच अंतिम वर्षातील आर्किटेक्चरल प्रोजेक्ट इ. विषयांचे ड्रॉईन्ग्स व मॉडेल्स मांडण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, सांघिक भावनेतून काम करण्याची प्रेरणा मिळावी व अभ्यासक्रमामध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या कामाबरोबरच त्यांचे इतर अनेक उपक्रम व छंद देखील मांडण्यात येणार आहेत.
डी. वाय. पाटील ग्रुपच्या सीएचआरओ श्रीलेखा साटम यांच्या हस्ते सोमवार २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. त्यानंतर प्रख्यात आर्किटेक्ट गीता बालकृष्णन (कोलकाता) यांचे विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान होईल. ३० एप्रिल रोजी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आर्किटेक्ट पंकज पळशीकर (मुंबई) यांचे ‘अँड बियॉंड’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सदर प्रदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतर कलाकृतींचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी गीता बालकृष्णन (चेन्नई) यांच्या एथॉस फौंडेशनसोबत तसेच गार्डन्स क्लब कोल्हापूर सोबत सामंजस्य करार होणार आहे. या करारांमुळे विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर व बांधकाम क्षेत्रातील विविध विषयांवरील सेमिनार व कार्यशाळेमध्ये भाग घेता येईल, त्याचबरोबर सामाजिक वनीकरण, साईट विझिट, सेमिनार व कार्यशाळेचे आयोजन, या सामंजस्य करार च्या अंतर्गत होणार आहे.