+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव. adjust*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा* *डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ adjustजनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा मंत्री हसन मुश्रीफ adjustशाहूप्रेमींच्या साक्षीने अभिवादन adjustछत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा काढला हा अपमान नाही काय? : राजेश क्षीरसागर adjustशाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरचे समतावादी विचार सिद्ध करा adjustशेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी शाहू महाराजच खासदार आवश्यक : आ. पी. एन. पाटील adjustसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ? : संभाजीराजे छत्रपती
schedule23 Apr 24 person by visibility 33 categoryराजकीय


कोल्‍हापूरःता.२३.कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघाच्‍यावतीने ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारातील श्री हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्‍यात आली. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संघाचे संचालक बाबासाहेब चौगले व त्‍यांच्‍या पत्नी सौ.विजयमाला चौगले यांच्या हस्‍ते उत्सवमूर्तीस रूद्र अभिषेक व इतर धार्मिक विधी करण्यात आले. श्री हनुमान जन्मकाळा निमित्त उपस्थित महिलांनी पाळणा म्हटला.यावेळी भजन व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे,जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, अंबरिषसिंह घाटगे, बाळासाहेब खाडे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, अमृता डोंगळे,पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ. प्रकाश साळुंखे, संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्‍ही. तुरंबेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, अशोक पाटील, बाजीराव पाटील, निवास पाटील, बाळासो वायदंडे, संकेत खाडे, मानसिंग खाडे, विनोद पाटील, बाळासो खांडेकर व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.