निगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद
schedule05 Apr 24 person by visibility 243 categoryराजकीय
कोल्हापूर ; आवाज इंडिया
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी बुधवारी करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथे संवाद साधला. दिलीपसिंह चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट दिली.
दिलीपसिंह चव्हाण, रणजीतसिंह चव्हाण, संग्रामसिंह चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी लोकसभा निवडणूक संदर्भात चर्चा झाली. "महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जिल्ह्यात सर्वत्र भरभरून प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी आपली उमेदवारी आहे" असे शाहू छत्रपतींनी सांगितले.
याप्रसंगी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी एच पाटील, बाजीराव पाटील, राजाराम कासार, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले आंबेवाडीचे सिकंदर मुजावर, शिये ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रभाकर काशीद, पंचायत समितीचे चंद्रकांत पाटील, निगवे दुमाला सरपंच रूपाली पाटील, उपसरपंच संकेत बामकर, जयहिंद सोसायटीचे चेअरमन बाळासो शिरोळकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बत्तास एकशिंगे, देवस्थानचे सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील, हंबीरराव वळके, पाणीपुरवठाचे चेअरमन सर्जेराव पाटील, डॉ. किडगावकर आदी उपस्थित होते.