Awaj India
Register
Breaking : bolt
चाळीस वर्षे समाजकारणाची परंपरा पुढे नेणारे उपमहापौर अक्षय जरग गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार: पाच लाख दूध उत्पादकाच्या पाठीशी राहणार डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सवाची सुरुवात उपमहापौर अक्षय विक्रम जरग यांच्या वाढदिवसानिमित्त २४७ रक्तदात्यांनी केले रक्तदानडी. वाय. पाटील अभियांत्रिकी* *एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सशाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसादसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा गेल्या हंगामातील रु. १०० चा हप्ता जमा*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळे गावातील प्रमुख मार्गावरील खड्डे बुजवास्वप्नपूर्ती जिल्हा सहकारी गृहतारण संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहातकरवीर तालुक्यातील गुंठेवारी प्रकरणांची विशेष चौकशी करा

जाहिरात

 

मानसिक आरोग्य व दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात सौ. स्नेहा पेंढे-जकाते यांचे योगदान कौतुकास्पद; '

schedule04 Mar 26 person by visibility 522 categoryउद्योग

कोल्हापूर (प्रतिनिधी):
गेल्या दशकभरापासून मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती आणि दिव्यांग मुलांच्या पुनर्वसनासाठी अहोरात्र झटणाऱ्या मल्लेवाडी येथील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सौ. स्नेहा ऋषिकेश पेंढे-जकाते यांना त्यांच्या सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे.
तज्ज्ञ मानसशास्त्रज्ञ म्हणून ओळख
सौ. स्नेहा पेंढे-जकाते यांनी २०१२ पासून मानसशास्त्राच्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. MA (Clinical Psychology) सोबतच त्यांनी 'रिहॅबिलिटेशन सायकॉलॉजी'मध्ये विशेष पदविका प्राप्त केली आहे. त्या केवळ रुग्णोपचार करत नाहीत, तर बालरोगतज्ज्ञ, हृदयविकार, मेंदूविकार आणि किडनी विकार तज्ज्ञांकडे 'ऑन-कॉल' सल्लागार म्हणून कार्यरत असून, शारीरिक व्याधींसोबतच रुग्णांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतात.
'स्नेहबंध'च्या माध्यमातून नवी उमेद
२०१९ मध्ये त्यांनी मल्लेवाडी येथे 'स्नेहबंध समुपदेशन व व्यसनमुक्ती केंद्र' सुरू केले. या केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणांना व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढले आहे. महाविद्यालयीन युवकांसाठी त्या 'कॉलेज कौन्सिलर' म्हणूनही काम पाहतात, जिथे विद्यार्थ्यांच्या ताणतणावांचे निराकरण केले जाते.
दिव्यांग मुलांसाठी विशेष कार्य
महाराष्ट्र राज्यातील विविध दिव्यांग व मतिमंद मुलांच्या शाळांमध्ये जाऊन सौ. स्नेहा या मुलांसाठी 'व्यवसाय प्रशिक्षण' (Vocational Training) आयोजित करतात. बौद्धिक अक्षमता असलेल्या मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. केवळ मुलेच नव्हे, तर अशा मुलांच्या पालकांचेही त्या समुपदेशन करून त्यांना मानसिक बळ देतात.
प्रसारमाध्यमांतून जनजागृती
केवळ क्लिनिकपुरते मर्यादित न राहता, त्यांनी 'सकाळ', 'पुढारी' यांसारख्या वृत्तपत्रांतून लेख लिहून आणि रेडिओ-टीव्हीच्या माध्यमातून मानसिक आरोग्याचा संदेश घराघरांत पोहोचवला आहे.
"मानसिक आरोग्य जपल्यास अर्धे आजार आपोआप बरे होतात. विशेषतः दिव्यांग मुलांमध्ये असलेली सुप्त कला ओळखून त्यांना स्वावलंबी करणे, हेच जीवनाचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes