+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव. adjust*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा* *डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ adjustजनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा मंत्री हसन मुश्रीफ adjustशाहूप्रेमींच्या साक्षीने अभिवादन adjustछत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा काढला हा अपमान नाही काय? : राजेश क्षीरसागर adjustशाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरचे समतावादी विचार सिद्ध करा adjustशेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी शाहू महाराजच खासदार आवश्यक : आ. पी. एन. पाटील adjustसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ? : संभाजीराजे छत्रपती
schedule10 Jan 24 person by visibility 95 categoryउद्योग
.

!!बातमी!!

 ‘गोकुळ’च्या नवी मुंबई वाशी येथील दुग्धशाळेमध्ये फॉलिंग फिल्म चिलरचे उद्घाटन

 

‘गोकुळ’च्या नवी मुंबई वाशी येथील रेफ्रीजरेशन सिस्टिमचे विस्तारीकरण

                             

मुंबई ता.१०: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वाशी शाखा (नवी मुबंई) येथील दुग्धशाळेच्या रेफ्रीजरेशन विभागामध्ये ८७१ Kw (किलो व्हॅट) क्षमतेचा नवीन बसविण्यात आलेल्या फॉलिंग फिल्म चिलरचे उद्घाटन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते तसेच संचालक मंडळ यांच्या उपस्थित मुंबई (वाशी) येथे मंगळवार दि.०९/०१/२०२४ इ.रोजी संपन्‍न झाले.

          यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळच्या वाशी शाखेकडील सुयोग्य नियोजन, कार्यक्षम व कुशल वितरण व्यवस्था यामुळे मुंबई शहर, उपनगरे,नवी मुंबई,ठाणे, पालघर, व रायगड जिल्ह्यामध्ये गोकुळ ब्रॅन्डच्या दुधाला दिवसेंदिवस ग्राहकांनकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. संघाच्या सध्याच्या स्वमालकीच्या नवी मुंबई येथील दुग्धशाळेमध्ये मिल्क चिलिंग, पाश्चरायझेशनसाठी प्रतिदिन ४ लाख लिटर इतकी दूध हाताळणी क्षमतेची रेफ्रीजरेशन सिस्टिम कार्यरत आहे. परंतु सध्या प्रतिदिन ६ लाख लिटर इतक्या दुधाचे हाताळणी होत आहे. त्यामुळे रेफ्रीजरेशन सिस्टिमची क्षमता कमी पडत असून रेफ्रीजरेशन सिस्टीम अधिक सक्षम होण्यासाठी रेफ्रीजरेशन विभागामध्ये ८७१ Kw (किलो व्हॅट) क्षमतेचा नवीन फॉलिंग फिल्म चिलर प्लांट बसवण्यात आला आहे. या चिलर प्लांटमुळे दूध पिशवीचे तापमान पूर्वी पेक्षा 2°C कमी मिळणार आहे. त्यामुळे दुधाची गुणवत्ता अधिक काळ टिकून राहण्यासाठी निश्चीतच मदत होणार आहे. सदर प्रोजेक्टसाठी १.६ कोटी खर्च आला असून हा पुणे येथील नामांकित मे. एक्टिव इंजीनियरिंग सर्विसेस यांनी कार्यान्वित केलेले आहे.

 या कार्यक्रमाचे यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्‍ठ संचालक विश्‍वासराव पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, नवी मुंबई (वाशी) व्यवस्थापक दयानंद पाटील, संघाचे व्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, ए.एस.स्वामी, पी.एम.आडनाईक, डी.डी.पाटील व संघाचे अधिकारी व कर्मचारी अदि उपस्थितीत होते.

------------------------------------------------------------------------------------------------------- फोटो ओळ – यावेळी उद्घाटन करताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्‍ठ संचालक विश्‍वासराव पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, नवी मुंबई (वाशी) व्यवस्थापक दयानंद पाटील, संघाचे डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी व संघाचे अधिकारी व कर्मचारी अदि दिसत आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------------

दिनांक - १०/०१/२०२४.

प्रति,                                                                                        

मा. संपादकसो, दैनिक/इलेक्‍ट्रॉनिक मिडीया/ वेब.

कृपया वरील प्रतिक्रया आपल्‍या लोकप्रिय दैनीकामध्‍ये प्रसिध्‍द करावी ही विनंती .

            कळावे, जनसंपर्क अधिकारी