*विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली आमदार सतेज पाटील यांची अजिंक्यतारा कार्यालय येथे सदिच्छा भेट*
कोल्हापूर
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची गुरुवारी अजिंक्यतारा कार्यालय येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी या दोघांमध्ये विविध विषयावर चर्चा झाली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांनी आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची अजिंक्यतारा कार्यालय येथे सदिच्छा भेट घेतली. महाविकास आघाडी मधील वजनदार नेते म्हणून आमदार सतेज पाटील यांची ओळख आहे. त्यामुळे कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या दानवे यांनी आमदार सतेज पाटील यांची आवर्जून भेट घेतली.
आमदार सतेज पाटील यांनी श्रीअंबाबाईची मूर्ती भेट देऊन विरोधी पक्षनेते दानवे यांचे स्वागत केले. दोघांनी एकत्रित चहा घेत जिल्ह्यातील व राज्यातील राजकीय विषय व अन्य मुद्यांवर चर्चा केली.
यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुनिल मोदी, रविकिरण इंगवले, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, तौफीक मुल्लाणी, आनंदा बनकर, युवराज गवळी, दताजीराव वारके, चंगेजखान पठाण, सुनिल शिंत्रे, वैभव उगळे आदी उपस्थित होते.