+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustसंविधानाबाबत गैरसमज पसरविणाऱ्या कॉंग्रेस प्रवृत्तीला कायमचे गाडा. " : राजेश क्षीरसागर; adjustमंडलिक, माने यांना विजयी करा ; राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन कदमबांडे adjustप्रवक्त्याचे वटमुखत्यारपत्र जाहीर सभेत चालते, संसदेत नाही; adjustशाहू विचार दर्शन पदयात्रेत समतेचा जागर adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही : नितीन बानुगडे-पाटील adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
schedule17 Mar 24 person by visibility 60 category
कोल्हापूर : आवाज इंडिया 

छत्रपती शाहू महाराज यांना निवडणुकीला उभे करणे हे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचे षडयंत्र आहे अशा पद्धतीचे अपरिपक्वपनाचे विधान खासदार संजय मंडलिकनी केले आहे

2009 ची निवडणूक ही सदाशिवराव मंडलिक यांनी एका वेगळ्या वळणावर लढवली हे सर्वांनाच माहित आहे *मंडलिक साहेबांनी आयुष्यभर जातीयवादी पक्षाच्या विरोधात आपला आवाज उठवला आणि फुले शाहू आंबेडकर विचार शेवटपर्यंत जपला हे जपत असताना कधीही कुणावर खालच्या पातळीवर टीका केली नाही हे त्यांचे मोठेपण होतं परंतु आज रोजी खासदार संजय मंडलिक यांनी पवार साहेबांच्या वर टीका करून नेमकं स्वतःचं हसू करून घेतला आहे आपण पूर्णतः जातीयवादी पक्षाच्या वळसचनीला जाऊन बसला आहात हा दोष तुमचा आहे अजूनही आपली उमेदवारी जाहीर केली नाही हे भाजपचे षडयंत्र आपल्याला ओळखता आले नाही

देश आणि फुले शाहू आंबेडकर यांचे विचार अडचणीत असताना छत्रपती शाहू महाराज हे स्वतःहून निवडणुकीला उभारण्याचा निर्णय घेतला आहे महाराज कोणीतरी सांगितल्यामुळे निवडणूक लढवतील एवढे ते अपरिपक्व नाहीत आपण विचार करायला हवा पवार साहेबांच्या मनात असे काही असते तर त्यांनी स्व. खासदार सदाशिवराव मंडलिकसाहेबांच्या नावाने देणाऱ्या पुरस्काराच्या वेळी आपण आयोजित केलेल्या प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावरील व्यासपीठावर हजेरी लावली नसती त्यावेळेस तो विषय संपला होता हे कळाले नाही याचे आश्चर्य वाटते

 छत्रपती शाहू महाराज आणि मंडलिक साहेब यांचे व्यक्तिगत संबंध सर्वश्रुत आहेत दोघांनीही एकमेकांवर अगदी मनापासून नुसतेच प्रेम केले नाही तर फॅमिली रिलेशन पण निर्माण केले मंडलिक साहेबांच्या प्रत्येक घरगुती कार्यक्रमात स्वतः जातीने उपस्थित राहणारे छत्रपती शाहू महाराज आम्ही पाहिलेत अनुभवले आहेत आजही मंडलिक घराण्या विषयी महाराजांच्या मनात नितांत आदर आहे आणि याचाही अनुभव आपणास वेळोवेळी आलेला आहे असे असताना असे विधान करणे योग्य नाही.