Awaj India
Register
Breaking : bolt
शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी साताप्पा विष्णू पाटील उपाध्यक्षपदी गजानन सखाराम कांबळे चुये येथील एस. एच. पी. हायस्कूलचा दहावीचा निकाल ९८% टक्के; सई पाटील विद्यालयात प्रथमपावसाळा १५ दिवसांवर तरीही नाले उपसा कागदावरमुरगुडमध्ये वृद्धाला लुटणारी इराणी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईराधानगरीतील फालेवाडा येथील खून प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईकॉम्रेड गोविंद पानसरे विचार संमेलन कोल्हापुरात डॉ. भारत पाटणकर उद्घाटक तर डॉ. कपिल राजहंस संमेलनाध्यक्षजिद्दीला मिळाले यश! २०२० पासूनच्या संघर्षानंतर रूथ सकटे पोलीस भरतीत चमकलीजिद्दीला मिळाले यश! २०२० पासूनच्या संघर्षानंतर रूथ सकटे पोलीस भरतीत चमकली​अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देणाऱ्या पालकांवर गुन्हे; कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाईकोल्हापूर पोलीस दलाचे 'ऑल आऊट ऑपरेशन': जिल्ह्यात गुन्हेगारांवर मोठी कारवाई, ठाण्यातील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

जाहिरात

 

शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी साताप्पा विष्णू पाटील उपाध्यक्षपदी गजानन सखाराम कांबळे

schedule10 May 26 person by visibility 5 categoryशैक्षणिक

कोल्हापूर (आवाज इंडिया प्रतिनिधी )
दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी साताप्पा विष्णू पाटील (एस. व्ही. पाटील) तर उपाध्यक्षपदी गजानन सखाराम कांबळे यांची निवड करण्यात आली. सहायक निबंधक चंद्रकांत इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड झाली.
 या दोघांच्या निवडी बिनविरोध झाल्या. नूतन अध्यक्ष पाटील हे करवीर तालुक्यातील आहेत. तर उपाध्यक्ष कांबळे हे गगनबावडा तालुक्यातील आहेत.
अध्यक्षपदासाठी पाटील यांचे नाव संचालक राजेंद्रकुमार लहू पाटील यांनी सुचविले. संचालक गौतम तुकाराम वर्धन यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी कांबळे यांचे नाव संचालक नंदकुमार तुकारामवाईंगडे यांनी सुचविले. त्यास संचालक अर्जुन दिनकर पाटील यांनी अनुमोदन दिले. 
 नूतन अध्यक्ष पाटील यांनी, ' या संधीचा मी बँकच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीन. अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये बँकेचा कारभार पारदर्शी होण्यासाठी आणि बँकेचा व्यवसाय व कर्जामध्ये वाढ व कर्ज व्याज दर कमी करण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. वचननाम्याच्या पूर्ततेसाठी सकारात्मक उर्जा घेऊन सभासदांच्या आर्थिक उन्नतीचा विचार घेऊनच संचालक मंडळ काम करील. सभासदांच्या अडचणी समजावून घेवून त्या सोडविण्यासाठी आपला प्रय राहील.'
 
या निवडीप्रसंगी संचालक बाळकृष्ण हळदकर, बाळासाहेब निंबाळकर, सुनिल एडके, शिवाजी रोडे-पाटील, सुरेश कोळी, वर्षा शरद केनवडे, नंदकुमार वाईगडे, अमर वरुटे, शिवाजी बोलके, रामदास झेंडे, बाबू परीट, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम यांची उपस्थिती होती. सुकाणू समितीचे सर्वश्री रविकुमार पाटील, सुनिल पाटील, विलास चौगुले, प्रमोद तौंदकर, विविध संघटनाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, जिल्ह्यातील शिक्षक पतसंस्थाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, श्री शाहू आघाडीचे सभासद उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes