सीमा शंकर शेवाळे राज्यस्तरीय प्रशासनरत्न पुरस्काराने सन्मानित
schedule30 Jul 24 person by visibility 1112 categoryलाइफस्टाइल
कोल्हापूर (प्रतिनिधी)
शेंडूर (ता.कागल) येथील सीमा शंकर शेवाळे यांना 'झिंदाबाद राज्यस्तरीय प्रशासनरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांगलीचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे याच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी माजी खासदार संजयकाका पाटील, प्रतिष्ठा न्यूजचे संपादक तानाजीराव जाधव, संतोष औधकर, शिवानी शेवाळे, सौरभ शेवाळे मान्यवर उपस्थित होते. सांगली या ठिकाणी प्रतिष्ठा न्युजच्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शेवाळे या आरोग्य विभाग कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत आहेत. आरोग्यसेवेत उत्कृष्ट कामगिरी व त्यांच्या समाजसेवेच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
शेवाळे यांचे शिक्षण चुये, इस्पूर्ली या ठिकाणी झाले. माध्यमिक शिक्षण घेत असताना त्यांनी उत्कृष्ट कबड्डीपट्टी म्हणून सुद्धा कामगिरी केली आहे. जिम्नॅस्टिक आणि कबड्डी स्पर्धेत त्यांनी जिल्हा व राज्यस्तरीय उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले. मुलगी शिवानी हिचे डि. फार्मसी तर मुलगा सौरभ याचे बीई सिविलमध्ये शिक्षण झाले आहे. महिला म्हणून अनेक जबाबदाऱ्या त्यांनी उत्कृष्टरित्या सांभाळल्या आहेत. पती शंकर शेवाळे यांच्या निधनानंतर प्रत्येक परिस्थितीला सामोरे जात त्यांनी कौटुंबिक जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे. त्यांना आई-वडील, भाऊ सुनील पाटील,आनंदा पाटील, यांचे मार्गदर्शन मिळाले.