+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव. adjust*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा* *डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ adjustजनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा मंत्री हसन मुश्रीफ adjustशाहूप्रेमींच्या साक्षीने अभिवादन adjustछत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा काढला हा अपमान नाही काय? : राजेश क्षीरसागर adjustशाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरचे समतावादी विचार सिद्ध करा adjustशेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी शाहू महाराजच खासदार आवश्यक : आ. पी. एन. पाटील adjustसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ? : संभाजीराजे छत्रपती
schedule20 Apr 24 person by visibility 73 categoryराजकीय
राजर्षी शाहू महाराजांचा वारसा विद्यमान शाहू छत्रपतींनी आपल्या कार्यातून जोपासला  

 आमदार पी.एन.पाटील

  काटेभोगाव परिसरातील प्रचार दौऱ्यात छत्रपती शाहू महाराजांना विजयी करण्याचे आवाहन  


कोल्हापूर : 
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यांचा व विचारांचा वारसा घेउन विद्यमान श्रीमंत शाहू छत्रपती यांनी समाजातील विविध घटकाला हात दिला आहे. ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती कोसळल्या, संकटे उदभवली त्यावेळी मदतीसाठी ते सर्वात पुढे होते. सामाजिक प्रश्न निर्माण झाले त्या त्या वेळी छत्रपती म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी नेहमीच पार पाडली आहे. खऱ्या अर्थाने राजर्षी शाहुंचा वारसा विद्यमान शाहू छत्रपतींनी आपल्या कार्यातून जोपासला असल्याचे प्रतिपादन आमदार पी.एन.पाटील यांनी केले. 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे व महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित काटेभोगाव येथील प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आनंदा खटांगळेकर होते. 

 यावेळी आमदार पी एन पाटील पुढे म्हणाले, विद्यमान शाहू छत्रपतींनी भोगावती परिसरात त्यांनी गोरगरिबांना २४ एकर जमीन दिली. आरे येथे मागासवर्गीय नागरिकांना साडेसहा एकर जमीन मोफत दिली. आंबेवाडी, चिखली येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी सोनतळी येथे चौदाशे कुटुंबीयांना विना मोबदला जागा दिली. लातूरमध्ये भूकंप असो, कोल्हापूर महापूर असो तेथे अन्नधान्याचा ट्रक घेऊन पोहोचले. १९८९ मध्ये महापुराची आपत्ती कोसळल्यानंतर शिंगणापूरमध्ये धान्य पुरवठा केला होता. कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्राला मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन त्यांचे लाभत आहे. शाहू छत्रपती हे सर्वसामान्य जनतेबद्दल आदर असणारे इंडिया आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आहेत. 

यावेळी जयसिंग हिर्डेकर, शाहू काटकर भारत पाटील भुयेकर, बाळासाहेब खाडे, एन.सी.पाटील, विलास पाटील, निवास पाटील, बाळासाहेब मोळे, बाजीराव देसाई बबन खटांगेकर, काळू गुरव, बाजीराव कांबळे, धीरज आंग्रे, तानाजी जरग,चंद्रकांत पाटील, कृष्णात शिखरे, बाळू पाटील, प्रकाश आंग्रे यासह कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.